नववधूच्या अपहरणाचा प्रयत्न; नातेवाईक व ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला, रत्नपूर तालुक्यातील इंदापूर येथील घटना

नववधूच्या अपहरणाचा प्रयत्न; नातेवाईक व ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला, रत्नपूर तालुक्यातील इंदापूर येथील घटना

कन्नड तालुक्यातील पिशोर येथून लग्न लावून येणाऱ्या नववधूचे रत्नपूर तालुक्यातील इंदापूर चौफुलीवर वाहन आडवे लावून अपहरण करण्याचा सिनेस्टाईल प्रयत्न नातेवाईक व गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे टळला. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. इतर चार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

तालुक्यातील बाजार सावंगी येथील एका तरुणाचे लग्न कन्नड तालुक्यातील पिशोर येथील येथील मुलीसोबत ठरले होते. शुक्रवार, 25 रोजी लग्न समारंभ आटोपल्यानंतर सायंकाळी नववधूला घेऊन सासरकडील मंडळी बाजार सावंगी कडे येत असताना इंदापूर चौफुलीवरअसलेल्या जय भवानी मंगल कार्यालयासमोर पांढऱ्या रंगाची क्रेटा गाडी (एम.एच.28 ए.झेड.6699) ही नवरदेव व नवरी असलेल्या गाडीला आडवी लावली. या गाडीतील सहा जणांनी नवरदेव नवरीच्या गाडीवर झडप घालत बळजबरीने गाडीचे दरवाजे उघडून नववधूला मुलीला जबरदस्तीने गाडी बाहेर ओढू लागले अचानक सुरू झालेल्या या प्रकारामुळे नवरदेव नवरीसह गाडीतील नातेवाईक घाबरून गेले. त्यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे चौफुलीवर धाव घेतली. नातेवाईक व नागरिकांनी विरोध करूनही अपहरणकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते शिवीगाळ करत नववधूला जबरदस्तीने गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. नवरदेव नवरी सह नातेवाईक व ग्रामस्थ विरोध करत होते. यामुळे गोंधळ वाढत गेला. मात्र सर्वांनी प्रयत्न करून अपहरणकर्त्यांना रोखून धरले काहीजणांनी प्रसंगावधान राखत याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक धनंजय फराटे हे पोलीस उपनिरीक्षक भालेराव, बनसोड पोलीस कर्मचारी विनोद बिघोत व अन्य सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले. पोलीस येत असल्याची कुणकुण लागताच अपहरणकर्त्यांनी आपल्या वाहनातून बाजार सावंगी कडे पळ काढला. बाजार सावंगी येथे शुक्रवारचा बाजार असल्याने रस्त्यावर नागरिकांची गर्दी होती. या ठिकाणाहून वेगाने गाडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या अपहरणकर्त्याच्या वाहनाने रस्त्यावरील तीन जणांना उडवले. यामध्ये एका जणांची प्रकृती अत्यवस्थ असून दोन जण जखमी झाले. यामध्ये गाडीचे नुकसान होऊन गाडी बंद पडल्याने गाडी सोडून अपहरणकर्त्यांनी तेथून पळ काढला. त्यांच्या मागावर असलेल्या पोलीस निरीक्षक फराटे यांच्या पथकाने त्यांचा पाठलाग करत यातील दोघा जणांना पकडले.

याप्रकरणी राहुल नलावडे रा. मयुर पार्क, छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आकाश मते, ज्ञानेश्वर मते, एजाज अय्युब शहा, सर्व रा. बिल्डा, ता. फुलंब्री, कासीफ असीफ खान, रा. फुलंब्री, रोहित बाळू भालेराव रा. इंदापूर ता. रत्नपुर, विनोद कसारे, रा. फुलंब्री यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एजाज आयुब शहा व कासिफ असिफ खान यांना पोलिसांनी अटक केली असून, यातील अन्य चौघा आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भालेराव हे करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उन्हाळ्यात नाराळाचे तेल त्वचेवर लावता? फायद्याऐवजी होईल नुकसान, जाणुन घ्या उन्हाळ्यात नाराळाचे तेल त्वचेवर लावता? फायद्याऐवजी होईल नुकसान, जाणुन घ्या
वाढत्या उष्णतेमुळे त्वचेच्या समस्या उद्भवतात. यासाठी अनेकजण त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय करत असतात. जेणे करून त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम...
40 मिनिटांत 4 किलोमीटर चालण्याचा फिटनेस ट्रेंड काय आहे? त्याचे फायदे जाणून घ्या
न्या. शिंदे समितीला ५८ लाख ८२ हजार ३६५ मराठा कुणबी नोंदी सापडल्या,सर्वाधिक नोंदी या जिल्ह्यात
रत्नागिरीत तीन पाकिस्तानी नागरिक
तुझे सगळे कपडे काढ आणि… अभिनेत्रीने साजिद खानवर लावले गंभीर आरोप
Ladki Bahin Yojana : त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, अजितदादांनी दिली मोठी अपडेट, यामध्ये तुमचा समावेश आहे का?
अजितदादांच्या ताफ्यावर मधमाशांचा हल्ला, पोलीस, अन् अधिकाऱ्यांना घेतला चावा