दृष्टिहीन तरुणानं करून दाखवलं! आईच्या मदतीने जिंकली ‘यूपीएससी’ची लढाई

दृष्टिहीन तरुणानं करून दाखवलं! आईच्या मदतीने जिंकली ‘यूपीएससी’ची लढाई

आईचा आशीर्वाद पाठीशी असेल तर अशक्य गोष्टही शक्य व्हायला वेळ लागत नाहीत. बिहारच्या रवीराजने हे सिद्ध करून दाखवले आहे. नवादा जिह्यात एका छोटय़ाशा महुली गावात राहणाऱ्या रविराजने दृष्टिहीन असूनही लोक सेवा आयोगाची कठीण परीक्षा उत्तीर्ण केली आहे. रविराजला 184 रँक मिळाली आहे. दृष्टिहीन असूनही रविराजने आपल्या गावाचे नाव संपूर्ण देशात प्रकाशझोतात आणले आहे. जगात कोणतीही गोष्ट करणे शक्य आहे, हे त्याने जगाला दाखवून दिले आहे. शेतकरी रंजन कुमार आणि विभा सिन्हा यांचा रविराज मुलगा आहे. रविराजला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही. रवीने याआधी बीपीएससी परीक्षेत 69 वी रँक मिळवली होती. त्याला महसूल विभागात अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली होती. परंतु रविराजने सुट्टी घेऊन यूपीएससीची तयारी केली होती. रविच्या या यशानंतर नवादाचे जिल्हाधिकारी रवि प्रकाश यांनी त्याची घरी जाऊन भेट घेत त्याचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. रविराजने यूपीएससीत मिळवलेले यश हे एकटय़ाचे नसून संपूर्ण जिह्याचे आहे, अशा शब्दांत जिल्हाधिकाऱयाने त्याचे कौतुक केले. रविराजचे प्राथमिक शिक्षण नवादाच्या दयाल पब्लिक स्पूलमधून तर पदवीचे शिक्षण सीताराम साहू काॅलेजमधून पूर्ण केले.

आईच बनली दृष्टी

रविराज हा दृष्टिहीन आहे. त्याला दिसत नाही. तरीही त्याने सर्वांत अवघड असलेली यूपीएससीची परीक्षा व्रॅक करण्याचा निर्धार केला. यासाठी त्याला आईची मदत मिळाली. रविराजची आई विभा सिन्हा या मुलाची दृष्टी बनल्या. आईने त्याला यूपीएससीसाठी लागणारी सर्व पुस्तके वाचून दाखवली. त्यातला सारांश समजावून सांगितला. पुस्तकासोबतच यूपीएससीसाठी उपलब्ध असलेल्या यूटय़ुबवरील आवश्यक साहित्याची मदत घेण्यात आली. ज्यावेळी आई स्वयंपाक करायची त्यावेळी रविराज यूटय़ुबवरील लेक्चर ऐकायचा. मला जे आज यश मिळाले ते केवळ आई आणि वडिलांच्या आशीर्वादाने मिळाले आहे. आई नसती तर मला हे यश मिळणे शक्यच नव्हते. माझ्या यशात आईचा तितकाच वाटा आहे, असे रविराज म्हणाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

न्या. शिंदे समितीला ५८ लाख ८२ हजार ३६५ मराठा कुणबी नोंदी सापडल्या,सर्वाधिक नोंदी या जिल्ह्यात न्या. शिंदे समितीला ५८ लाख ८२ हजार ३६५ मराठा कुणबी नोंदी सापडल्या,सर्वाधिक नोंदी या जिल्ह्यात
मराठा आरक्षणावरुन राज्यात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने रान पेटवले होते. मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी लावून...
रत्नागिरीत तीन पाकिस्तानी नागरिक
तुझे सगळे कपडे काढ आणि… अभिनेत्रीने साजिद खानवर लावले गंभीर आरोप
Ladki Bahin Yojana : त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, अजितदादांनी दिली मोठी अपडेट, यामध्ये तुमचा समावेश आहे का?
अजितदादांच्या ताफ्यावर मधमाशांचा हल्ला, पोलीस, अन् अधिकाऱ्यांना घेतला चावा
Latur News – जुन्या वादातून तरुणाची हत्या, दोघांविरोधात गुन्हा दाखल
हे असं चालणार नाही… समज द्या नाहीतर कारवाई करू; फडणवीसांचा मिंध्यांना इशारा