हे असं चालणार नाही… समज द्या नाहीतर कारवाई करू; फडणवीसांचा मिंध्यांना इशारा
मिंधे गटातील बेताल वक्तव्य करणारे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांबाबत एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय गायकवाड यांना एक इशारा दिला आङे. ”जर एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाड यांना कडक समज दिली नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल’, असा इशाराच फडणवीसांनी दिला आहे.
आमदार संजय गायकवाड ”महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खातं जगात कुठेही नाही’, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याबाबत फडणवीसांना पत्रकारांनी विचारताच त्यांनी मिंधे गटाला कडक शब्दात इशारा दिला. ” पोलिसांबाबत अशा प्रकारे बोलणं योग्य नाही. मी स्वत: या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले असून संबंधित आमदाराला कडक शब्दात समज देण्यास सांगितले आहे. हे असं योग्य नाही. जर हे वारंवार होत राहिलं तर कारवाई केली जाईल, असं फडणवीस म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List