राज्यात 107 पाकिस्तानी बेपत्ता असल्याचा उपमुख्यमंत्री शिंदेंचा दावा, मुख्यमंत्री फडणवीसांना काढला खोडून
राज्यात 107 पाकिस्तानी नागरिक हे बेपत्ता आहेत असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. पण दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा खोडून काढला आहे. त्यामुळे एकाच सरकारमधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात एकवाक्यता आहे की नाही असा सवाल उपस्थित होतोय.
आज बुलढाण्यात एका सभेत बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की राज्यात 107 पाकिस्तानी नागरिक हे बेपत्ता आहेत. पण पोलीस त्यांना शोधून काढतील असे शिंदे म्हणाले. दुसरीकडे पुण्यात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की कुठलेही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता नाहीत. सर्व पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्याची व्यवस्था केली जात आहे. आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल असेही फडणवीस म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List