IPL 2025 – दिल्ली-बंगळुरूमध्ये अव्वल स्थानासाठी लढाई
आयपीएलच्या गुणतालिकेत सध्या गुजरात टायटन्सचा संघ अव्वल स्थानी आहे. मात्र, रविवारी (दि. 27) रात्री दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणाऱ्या लढतीत जो संघ जिंकेल, तो अव्वल स्थानावर विराजमान होणार आहे.
विराट कोहली सध्या सुपर फॉर्मात असल्याने बंगळुरूच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, मागील लढतीत अनुभवी लोकेश राहुलने तुफानी फलंदाजी करीत बंगळुरूच्या घशातून सामना खेचून आणला होता. त्यामुळे या परतीच्या लढतीत दिल्लीला हरवून पराभवाची परतफेड करण्यासाठी बंगळुरूला सर्वच आघाड्यांवर सरस कामगिरी करावी लागणार आहे.
उभय संघांमध्ये आतापर्यंत 32 सामने झाले असून, त्यात दिल्लीने 12, तर बंगळुरूने 19 लढती जिंकल्या आहेत. एक लढत अनिर्णित राहिली होती. म्हणजेच आयपीएलच्या इतिहासात बंगळुरूचे पारडे जड आहे. त्यामुळे कोणता संघ कोणाची शिकार करून गुणतक्त्यात नंबर वनच्या सिंहासनावर विराजमान होणार, याकडे तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा असतील.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List