पहलगाम हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबीयांना न्याय मिळणारच, दहशतवाद संपवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्धार
जम्मू कश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. त्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. त्यावर हल्ल्यातील मृत पावलेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांना न्याय मिळणार असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तसेच देशातला दहशतवाद संपवणार असेही मोदी म्हणाले.
मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले की, कश्मीर पुन्हा उद्ध्वस्त व्हावे म्हणून दहशतवादी आणि त्यांच्या आकांनी हा हल्ला केला आहे. दहशतवादाच्या या लढाईत 140 कोटी हिंदुस्थानींची एकजूट ही आपवी सर्वांची मोठी ताकद आहे. गेल्या काही वर्षात जम्मू कश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची संख्या वाढली होती, लोकांचे उत्पन्न वाढले होते. तरुणांसाठी ही नवी संधी होती, पण देशांच्या शत्रूंना ही बाब पचणारी नव्हती असे मोदी म्हणाले.
या हल्ल्यात ज्यांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे त्यांचे दुःख मी समजू शकतो असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच या हल्ल्यामुळे देशातल्या प्रत्येक नागरिकाला दुःख झाले आहे. दहशतवादी हल्ल्याचे फोटो पाहून प्रत्येक नागरिक चिडला आहे असेही मोदी म्हणाले. तसेच जम्मू कश्मीरमध्ये शांतता नांदत होती, पर्यटन क्षेत्र वाढत होतं, तरुणांसाठी नव्या संधी निर्माण होत होते, शाळा कॉलेज विद्यार्थांनी फुललं होतं. पण देशाच्या शत्रूंनी ही बाबा रुचली नाही. त्यांना जम्मू कश्मीर पुन्हा उद्ध्वस्त करायचं आहे. तसेच या घटनेचा पंतप्रधान मोदींनी कडक शब्दांत निषेध केला. या दहशतवादाच्या विरोधात संपूर्ण जग आपल्यासोबत आहेत देशाचे 140 कोटी जनतेची एकजूट आहे असेही मोदी म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List