वायू प्रदूषण करणाऱ्या 1623 जणांना कारवाईचा डोस, 74 लाख 88 हजार रुपयांचा दंड वसूल

वायू प्रदूषण करणाऱ्या 1623 जणांना कारवाईचा डोस, 74 लाख 88 हजार रुपयांचा दंड वसूल

औद्योगिक व नागरी वसाहतीत प्लॅस्टिक वापर आणि वायू प्रदूषण करणाऱ्या 1 हजार 623 जणांना पिंपरी चिंचवड महापालिकेने दंडात्मक कारवाईचा दणका दिला आहे. त्यांच्याकडून तब्बल 74 लाख 88 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरू केलेल्या ‘ग्रेडेड रिस्पॉन्स अ‍ॅक्शन प्लान’ अर्थात ग्रॅप. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हा प्रकल्प सुरू करण्यात आला. प्रत्यक्षात गेल्या पाच महिन्यांत वेगवेगळ्या प्रभागांत दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे, महापालिका कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. रहिवाशी भागात आरएमसी आणि स्टोन क्रशर प्लांटदेखील सुरू आहेत. महापालिकेची विविध विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे शहरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. या प्रकल्पासाठी मसेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंगफ (सीडेंक) द्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘ग्रॅप’ उपक्रमास सुरुवात करण्यात येणार आहे. महापालिकेने हवा शुद्धीकरण, धूळ घालविणारी उपकरणे, रस्ता साफसफाईसाठी वाहने (रोड वॉशर) आणि स्प्रिंकल आधारित विविध चौकातील पाण्याचे फवारे, अशा विविध यंत्रणांकडून हवा प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
‘ग्रॅप’ प्रणालीचा एक भाग म्हणून पर्यावरणीय प्रदूषणाचा सामना करण्यासाठी ठोस उपाययोजना सुरू केल्या आहेत. पथकात 1 प्रोजेक्ट मॅनेजर, 4 पर्यवेक्षक, 32 जण प्रत्यक्ष जागेवर कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांकडून शहरामध्ये रात्रं-दिवस गस्त घातली जात आहे.

पथकाच्या कामाचे स्वरूप
रस्त्यावरील धूळ नियंत्रित करणे, कचऱ्याची विल्हेवाट लावणे, वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणे. डिझेल जनरेटरवरील निर्बंध घालणे, रस्त्यांची स्वच्छता आणि सार्वजनिक वाहतुकीचा प्रचार आदींचा समावेश आहे. प्रदूषण करणारे उद्योग बंद करणे.

हवा प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने उपद्रव शोधपथक नियुक्त केले आहे. बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यामुळे प्रदूषण होणाऱ्या घटकांवर प्रभावीपणे कारवाई करण्यास मदत होत आहे. शहराला प्रदूषणमुक्त करण्यासाठी हा उपक्रम सुरू केलेला आहे. – संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, महापालिका

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

न्या. शिंदे समितीला ५८ लाख ८२ हजार ३६५ मराठा कुणबी नोंदी सापडल्या,सर्वाधिक नोंदी या जिल्ह्यात न्या. शिंदे समितीला ५८ लाख ८२ हजार ३६५ मराठा कुणबी नोंदी सापडल्या,सर्वाधिक नोंदी या जिल्ह्यात
मराठा आरक्षणावरुन राज्यात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने रान पेटवले होते. मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी लावून...
रत्नागिरीत तीन पाकिस्तानी नागरिक
तुझे सगळे कपडे काढ आणि… अभिनेत्रीने साजिद खानवर लावले गंभीर आरोप
Ladki Bahin Yojana : त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, अजितदादांनी दिली मोठी अपडेट, यामध्ये तुमचा समावेश आहे का?
अजितदादांच्या ताफ्यावर मधमाशांचा हल्ला, पोलीस, अन् अधिकाऱ्यांना घेतला चावा
Latur News – जुन्या वादातून तरुणाची हत्या, दोघांविरोधात गुन्हा दाखल
हे असं चालणार नाही… समज द्या नाहीतर कारवाई करू; फडणवीसांचा मिंध्यांना इशारा