Mumbai News – प्रभादेवीत बेस्टने बसने डिलिव्हरी बॉयला चिरडले, अपघातानंतर चालक फरार
भरधाव बेस्ट बसने डिलिव्हरी बॉयला चिरडल्याची घटना शनिवारी रात्री मुंबईतील प्रभादेवी परिसरात घडली. याप्रकरणी बेस्ट बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्घटनेनंतर बस चालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
प्रभादेवीतील अप्पासाहेब मराठे रोडवर शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. बस भरधाव वेगात होती. यादरम्यान डिलिव्हरी बॉय अचानक समोर आला. यावेळी बस वेगात असल्याने चालकाला नियंत्रण मिळवता आले नाही आणि डिलिव्हरी बॉय बसखाली आला.
सार्थक जंगम (21) असे मयत डिलिव्हरी बॉयचे नाव असून तो वरळी कोळीवाडा येथीव रहिवासी आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून, बस चालकाविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे. पोलीस फरार चालकाचा शोध घेत आहेत. सध्या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List