चालकाचे नियंत्रण सुटले अन् व्हॅन थेट विहिरीत कोसळली, 10 जणांचा मृत्यू

चालकाचे नियंत्रण सुटले अन् व्हॅन थेट विहिरीत कोसळली, 10 जणांचा मृत्यू

चालकाचे नियंत्रण सुटल्याने व्हॅन थेट विहिरीत कोसळल्याने 10 जणांचा मृत्यू झाला. चौघे जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि अन्य बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात रविवारी दुपारी ही दुर्घटना घडली.

मंदसौर जिल्ह्यातील कचरिया गावात ही घटना घडली. व्हॅनमध्ये लहान बालकांसह एकूण 13 जण होते. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने व्हॅन अनियंत्रित झाली. यानंतर व्हॅन रस्त्याशेजारी असलेल्या विहिरीत कोसळली. यात व्हॅनमधील 9 जण आणि प्रवाशांचे जीव वाचवण्यासाठी विहिरीत उतरलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला.

बचाव पथकांनी तात्काळ बचावकार्य हाती घेत चौघांना विहिरीतून बाहेर काढले. चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विहिरीत विषारी वायू असल्याची माहिती मिळते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पहलगाम हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णींचं धाडसी पाऊल; शत्रूला मोठी चपराक पहलगाम हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णींचं धाडसी पाऊल; शत्रूला मोठी चपराक
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर टूर्सच्या बुकिंग एकामागोमाग एक रद्द होत असताना, काश्मीरला भेट द्यायला पर्यटक घाबरत असताना अभिनेते अतुल कुलकर्णी...
शेजाऱ्याच्या अंडरगारमेंटमध्ये गुपचूप ही वस्तू टाकायचे… परेश रावल यांच्या या खोडी माहिती आहेत का?
कश्मीर खोऱ्यातील गावात दहशतवादाचा काळाकभिन्न अंधार…
पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, एलओसीवर पुन्हा गोळीबार; हिंदुस्थानी लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
पाकिस्तानच्या तुरुंगातील 193 हिंदुस्थानी मच्छीमारांचे काय होणार? महाराष्ट्रातील 18 जणांचा समावेश, केंद्र सरकारला आर्जव
एनआयएच्या हाती महत्त्वाचे पुरावे; दहशतवाद्यांची उलटी गिनती सुरू ,कोम्बिंग ऑपरेश सुरूच, 500 ठिकाणी धाडी
पालिका जपणार विद्यार्थ्यांचे वाचनप्रेम; प्रत्येक वॉर्डमध्ये सुरू होणार सुट्टीतले वाचनालय