‘घौरी, शाहीन, गझनवी क्षेपणास्त्रे आणि 130 अणुबॉम्ब हिंदुस्थानसाठी तयार आहेत; पाकिस्तानच्या रेल्वेमंत्र्यांची दर्पोक्ती
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने सिंधू पाणी करार रद्द केल्यामुळे पाकड्यांचा जळफळाट होत आहे. हिंदुस्थानने तातडीने घेतलेला निर्णय आणि लष्करी कारवाईच्या भीतीने पाकड्यांचे नेते दररोज दर्पोक्ती करत आहेत. आता पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी दर्पोक्ती करत हिंदुस्थानला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. हिंदुस्थानने पाकिस्तानचे पाणी रोखले तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल, असे फुत्कारही त्यांनी सोडले आहेत.
हनीफ अब्बासी म्हणाले, ‘आपली सर्व क्षेपणास्त्रे हिंदुस्थानच्या दिशेने आहेत. हिंदुस्थानने कोणतीही कारवाई केल्यास आम्ही उत्तर देण्यास तयार आहोत. आपल्याकडे जगातील सर्वात शक्तिशाली अणुबॉम्ब आहे. आम्ही घौरी, शाहीन, गझनवी सारखी क्षेपणास्त्रे आणि 130 अणुबॉम्ब फक्त हिंदुस्थानसाठी ठेवले आहेत. राजनैतिक प्रयत्नांसोबतच, आम्ही आमच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी पूर्ण तयारीही केली आहे. पहलगाम हल्ला हा फक्त एक निमित्त आहे, असेही ते म्हणाले.
सिंधू पाणी करार रद्द करणे हे युद्धाचे निमित्त ठरू शकते. हिंदुस्थानने सिंधू पाणी करार थांबवला तर तो युद्धाचा गुन्हा मानला जाईल आणि पाकिस्तान कोणत्याही कारवाईला योग्य उत्तर देण्यास तयार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List