Influencer ला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न, तरुणीने शिकवला धडा
एका Instagram Influencer ला चुकीच्या पद्धतीने एक तरुण स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा या तरुणीने त्याला जाब विचारला आणि त्याला चांगलाच धडा शिकवला आहे.
मानसी सुरवसे ही तरुणी आपल्या सोसायटीच्या जिन्यावर एक व्हिडीओ शूट करत होती. तेव्हा एक तरुण तिथून जात होता. तेव्हा मानसीने त्याला जायला जागा दिली. पण जाताना हा तरुण तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा मानसी बाजूला झाली. हा तरुण जेव्हा पळत होता तेव्हा मानसीने त्या धरून जाब विचारला. तरुण गयावया करत माफी मागत होता तेव्हा मानसीने या तरुणाचा जोरदार कानशिलात लगावली.
ही संपूर्ण घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेचा व्हिडीओ शूट करत मानसीने सांगितले की मी माझ्या इमारतीत हा व्हिडीओ शूट करत होते तेव्हा ही घटना घडली. मी हा व्हिडीओ या मुलाच्या पालकांना दाखवला तर ते म्हणाले की त्याची मानसिक स्थिती ठीक नाही. कुठल्या अँगलने हा आजारी वाटतो? तरी मी योग्य कपडे घातले होते तरी अशी घटना घडली. जर मी साधी कुर्ती किंवा साडी नेसली असती तरी त्याने असाच प्रकार केला असता, असेही मानसी म्हणाली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List