Jalna Crime News – कुऱ्हाडीने वार करुन मित्राचा खून, आईवर शिवीगाळ केल्याचा राग
जालना तालुक्यातील जामवाडी शिवारात मित्राने दारु न पाजल्याने त्यास शिवीगाळ केली. याचा राग मित्राला आला आणि मित्राने मागेपुढे न बघता थेट मित्राच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करुन ठार केले. या प्रकरणी आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन तासात जेरबंद केले. ही घटना तालुका जालना पोलीस ठाणे हद्दीतील जामवाडी शिवारात 25 एप्रिल रोजी रात्री घडली.
जालना शहरातील कन्हैयानगरातील नरेश उर्फ बंटी नारायण रंजवे यास 25 एप्रिल रोजी देऊळगावराजा रोडवरील हॉटेल भागीरथी टी हाऊसच्या मागील मोकळ्या जागेत जामवाडी शिवारात ठार मारले होते.
आरोपीचा तत्काळ शोध घेऊन अटक करण्याबाबत पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना सूचना दिल्या होत्या. आरोपीचा शोध घेत असताना माहिती मिळाली होती की, नरेश उर्फ बंटी नारायण रंजवे रा. कन्हैयानगर याचा त्याचा मित्र संदीप ज्ञानेश्वर राऊत रा. कन्हैयानगर, जालना याने खून केला असून, तो सध्या जामवाडी येथे आहे. त्याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले.
संदीप राऊत याची चौकशी केली असता त्याने सांगितले की, भागीरथी टी हाऊसवर असतांना नरेश उर्फ बंटी याने त्यास दारु पाजण्याचा आग्रह केला. संदीपने त्यास दारु न पाजल्याने दोघांमध्ये झटापटी होऊन नरेशने आरोपीच्या आईवर शिवीगाळ केली. या गोष्टीचा मनात राग धरुन आरोपीने लोखंडी कुऱ्हाडीने गळ्यावर वार करुन त्याचा खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल व पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सैम्युअल कांबळे, गोपाल गोशिक, रामप्रसाद पव्हरे, भाऊराव गायके, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, कैलास खार्डे, जगदीश बावणे, संभाजी तनपुरे, सुधीर वाघमारे, सतीश श्रीवास, देविदास भोजणे, आक्रूर धांडगे, कैलास चेके, सोपान क्षीरसागर, संदीप चिंचोले, रमेश काळे, किशोर पुंगळे, पोहेकाँ गणपत पवार, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे यांनी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List