टेस्लाने चीनमध्ये कार विक्री थांबवली
अमेरिकेचे उद्योगपती आणि ट्रम्प प्रशासनातील सहकारी एलॉन मस्क यांनी चीनमध्ये टेस्ला कंपनीच्या कारच्या दोन मॉडेल्सची विक्री थांबवली आहे. चीनने अमेरिकेच्या वस्तूंवर 125 टक्के कर लादल्याच्या निर्णयानंतर मस्क यांनी हा निर्णय घेतला आहे. टेस्लाच्या प्रीमियम कार एस आणि एक्स अशी या दोन मॉडेल्सची नावे आहेत. हे दोन्ही मॉडेल्स अमेरिकेतील कॅलिफॉर्निया प्लांटमध्ये तयार केली जातात. अमेरिकेच्या 145 टक्के टॅरिफला प्रत्युत्तर म्हणून चीनने अमेरिकेवर 125 टक्के टॅरिफ लादला आहे. ट्रम्प यांच्या चीनसोबतच्या टॅरिफ वॉरवर एलॉन मस्क यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List