पुण्यात लुटमारीचा ‘दे धक्का’ पॅटर्न, पादचाऱ्यांना धक्का मारून पाया पडण्याचे नाटक; दोघांना अटक

पुण्यात लुटमारीचा ‘दे धक्का’ पॅटर्न, पादचाऱ्यांना धक्का मारून पाया पडण्याचे नाटक; दोघांना अटक

रस्त्याने पायी जाणाऱ्या नागरिकांना मुद्दामहून धक्का मारून त्यांच्या पाया पडण्याचे नाटक करीत खिशातील पैसे चोरणाऱ्या दोघा सराईतांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून दुचाकी जप्त करण्यात आली असून, त्यांनी अशाप्रकारे कोणत्या ठिकाणी गुन्हे केले आहेत का, याबाबतची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. अस्लम इस्माइल शेख (वय – 21, रा. बिल्डिंग नं. 1, फ्लॅट नं. 206, नवीन म्हाडा, सातवाडी, हडपसर) आणि साद अकबर पठाण (वय – 23, रा. गल्ली क्र. 7 ए वेस्टर्न बेकरी गल्ली, सय्यदनगर, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

तक्रारदार हे 9 एप्रिलला धनकवडीतील शाहू बँक चौकातून पायी चालले होते. त्या वेळी दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांना विनाकारण धक्का मारला. त्यानंतर गाडी थांबवून दोघांनी तक्रारदाराला आमची चूक झाली, माफ करा असे म्हणत पाया पडण्याचा बहाणा केला. त्यानंतर दोघांपैकी एका चोरट्याने तक्रारदाराच्या खिशातून 30 हजारांची रोकड चोरून नेली. रक्कम खिशात नसल्याचे लक्षात येताच, तक्रारदाराने सहकारनगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी 136/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303 (2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला.

गुन्हयाच्या अनुषंगाने सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड, पोलीस निरीक्षक सुरेखा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींनी वापरलेल्या दुचाकी क्रमांकावरून वाहन मालकाची माहिती मिळविली. त्यानुसार ही चोरी सराईत अस्लम शेख आणि साद पठाण यांनी केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार पथकाने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्या वेळी दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील, एसीपी राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘अशोक चव्हाण साहेब, विचारधारेशी निष्ठा नसेल तर…’, रोहित पवारांचं प्रत्युत्तर ‘अशोक चव्हाण साहेब, विचारधारेशी निष्ठा नसेल तर…’, रोहित पवारांचं प्रत्युत्तर
माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल...
मिठात कुस्करलेल्या मिरच्या, तुपाची फोडणी; अभिनेत्री ऐश्वर्या यांनी केलं काजूच्या बोंडूचं चमचमीत भरीत
Tomato Side Effects: टोमॅटो खाण्यातचे दुष्परिणाम तुम्हाला माहिती आहे का?
रोज एक डाळिंब खाल्ल्याने आरोग्याला मिळतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे
मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न आधीच सोडवता आला असता, टँकर संपावरून आदित्य ठाकरे यांची सरकारवर टीका
Saree Reuse- वॉर्डरोबमध्ये ठेवलेल्या जुन्या साड्या कशा वापरायच्या! वाचा सविस्तर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक दलित, मुस्लीम किंवा महिला कधी करणार? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना सवाल