किस्से आणि बरंच काही – खेळ मांडला

किस्से आणि बरंच काही – खेळ मांडला

>> धनंजय साठे

 एकीकडे 200 कोटींचा बार उडवून एक अतिशय अर्थहीन फ्लॉप सिनेमा बनवला जातो आणि दुसरीकडे बजेट नसल्यामुळे काटकसर करत एखादा मराठी सिनेमा तयार होतो. आपल्याकडे वर जाणाऱयाचे पाय खेचून त्याला खाली पाडायचा खेळ जेव्हा संपेल तेव्हाच खऱया अर्थाने आपल्याला दर्जेदार मराठीतून कलाकृती पाहायला मिळ्तील. तोपर्यंत बजेटची रडारड आणि अंथरून बघून हातपाय पसरूनच झोपावं लागणार.

‘देने वाला जब भी देता, देता छप्पर फाडके…’ अशी एक प्रचलित म्हण आहे, पण सध्याची सिनेसृष्टीची आर्थिक परिस्थिती बघता त्या छप्पराला ठिगळ लावायची वेळ आली आहे की काय असं वाटतंय. इथे देने वाला देव नसून सिनेमा बघणारा सामान्य प्रेक्षक आहे आणि या चाणाक्ष प्रेक्षकांनी काही सिनेमांना सरळ बाहेरचा रस्ता दाखवला आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या एका मोठय़ा स्टारच्या सिनेमाचंच उदाहरण घ्या. चित्रपटाचा नायक आणि नायिकेमध्ये 31 वर्षांचे अंतर असल्याने समाजमाध्यमांवर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली.

परंतु हीरो मंडळी आणि हिरोईनला किंवा तिच्या आई-वडिलांना काही हरकत नाही तर पब्लिक कशाला आमच्या वयाची चर्चा करतेय असा बालिश प्रश्न सिनेमाच्या नायकाने चित्रपटाच्या प्रोमोशनच्या दरम्यान उपस्थित केला होता. अरे, हेच पब्लिक तुझा सिनेमा पाहणार ना! त्यांना काही मूलभूत प्रश्न पडले तर या हिरोचं काय बिघडतं? प्रेक्षकांना गृहीत धरायचे दिवस आता गेले. कोणी स्टार राहिलेला नाही. खिशातले पैसे खर्च करून एका अपेक्षेने सिनेमागृहात येणाऱया प्रेक्षकाला पूर्ण हक्क आहे त्याचे पैसे वसूल करून घेण्याचा. माझे फॅन्स माझा सिनेमा 100 कोटींच्या घरात आरामात नेतील असं हेकेखोरपणे, उद्धटपणे आणि उर्मटपणे बोलणाऱया हिरोला त्याच्याच फॅन्सने त्याची जागा दाखवून दिली. सिनेमा फ्लाप झाला. त्यामुळे स्वप्ननगरीत राहणाऱया या हिरो-हिरोईन, निर्माते आणि दिग्दर्शकांना आम्हा प्रेक्षकांना गृहीत धरणं निदान आत्ता तरी सोडावं.

अहो, चक्क चालू असलेले सिनेमागृहातले प्रांतीय भाषेमधले सिनेमे जबरदस्तीने उतरवायला लावतात. का? तर यांचे करोडोंचे बजेट असणारे हिंदी सिनेमे घुसवायचे असतात. हा जो साठीच्या हिरोचा सिनेमा जो नुकताच 12 वाजता लागून 12.30 ला पडला, त्याचा हा सिनेमा दुसऱयाच दिवशी अनेक सिनेमागृहातून उतरवावा लागला आणि त्याजागी अन्य भाषेचे त्या-त्या प्रांतातले सिनेमे प्रदर्शित करावे लागले. पब्लिकने सरळ पाठ फिरवली.

आज कोटय़वधी रुपये खर्च करणाऱया निर्मात्यांची डोकी कुठे गहाण ठेवली आहेत कोण जाणे? पण सामान्य हुशार लोकांनाही स्पष्ट दिसेल असं चित्र या स्वयंघोषित निर्मात्यांना का नाही दिसत? हा निदान माझा तरी भाबडा प्रश्न आहे. उघडय़ा डोळ्यांना दिसतंय की, चित्रपटसृष्टीतला खिलाडी कुमारचे लागोपाठ जवळ जवळ 15 सिनेमे आपटले. तरी याचे नवीन सिनेमा प्रदर्शित होताना दिसतात. कसा काय परवडतं बुवा? म्हणजे या निर्मात्यांना कुबेराचा पाठिंबा आहे की काय असं वाटतं.

…आणि दुसऱया टोकाला आपला मराठी सिनेमा. चांगली कथानके असूनही आवश्यक ते पाठबळच मिळत नाही. बरं जसं हिंदी सिनेमा बनवल्यानंतर जेवढं बजेट प्रोमोशन्ससाठी आखलं जातं त्याच्या आसपास कुठेही मराठी सिनेमा फिरकत नाही. कोणी तरी एखादा इंडस्ट्रीतला अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला माणूस निर्मात्याला शोधून काढतो आणि अख्खा सिनेमाची निर्मिती करणं किती फायद्याचा व्यवसाय आहे हे त्या बेसावध निर्मात्याला पटवून देतो. जणू सिनेमा निर्मितीपासून दूर राहून त्या निर्मात्याने किती मोठा गुन्हा केला होता. मग पद्धतशीरपणे सिनेमाचा गल्ला येण्याचा मार्ग तो माणूस निर्मात्याला समजावून सांगतो आणि एक सप्तरंगाने भरलेलं इंद्रधनुष्य निर्मात्याला दिसायला लागलं की, तो इसम काम फत्ते करून मोकळा होतो. शून्य प्लॅनिंग, वेडीवाकडी आकडेमोड आणि अख्खं जग गुलाबी भासवणारा चष्मा निर्मात्याच्या डोळ्यांवर चढवला जातो. त्यानंतर सोन्याची अंडी देणाऱया त्या कोंबडीला एका झटक्यात कापलं जातं आणि आयुष्यात पुन्हा कधीच सिनेमा निर्मितीच्या दिशेने जाणार नाही असा कानाला खडा लावून तो बिचारा निर्माता अंधारात कुठेतरी लुप्त होतो. त्यामुळे चांगलं व प्रामाणिक काम करणाऱयांना बजेट नसण्याचे भोग भोगावे लागतात.

त्यात ओटीटीचा बाजार आहेच. चांगल्या गोष्टी लिहिणारे, उत्तम कलाकृती बनवण्याची क्षमता असलेल्या अनेकांना संधीच मिळत नाही. सगळ्यांना instant यश हवं असतं.  शोकांतिका म्हणावी लागेल की, एकीकडे 200 कोटींचा बार उडवून एक अतिशय अर्थहीन फ्लॉप सिनेमा बनवला जातो आणि दुसरीकडे बजेट नसल्यामुळे किंवा कमी असल्यामुळे काटकसर करत एखादा मराठी सिनेमा तयार होतो. दक्षिणेतले निर्माते शहाणेच म्हणावे लागतील. ते व्यवस्थित बजेट घेऊन मोठे सिनेमे बनवतात, तेही त्यांच्या प्रेक्षकांच्या आवडीनुसार. ते सिनेमे हिंदी भाषेत डबसुद्धा करून घेतात. त्यांचे सिनेमे देशभरात पोहोचवतात. आपल्याकडे वर जाणाऱयाचे पाय खेचून त्याला खाली पाडायचा खेळ जेव्हा संपेल तेव्हाच खऱया अर्थाने आपल्याला दर्जेदार मराठीतून कलाकृती पाहायला मिळतील. तोपर्यंत बजेटची रडारड आणि अंथरून बघून हातपाय पसरूनच झोपावं लागणार. बिकट आहे ना चित्र?

[email protected]

(लेखक िक्रएटिव्ह हेड, अभिनेते आणि गायक आहेत.)

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लोकल ट्रेन लेट.. मग बोटीने कामाला जा, मुंबईत धावणार वॉटर टॅक्सी, कोच्ची करणार मदत लोकल ट्रेन लेट.. मग बोटीने कामाला जा, मुंबईत धावणार वॉटर टॅक्सी, कोच्ची करणार मदत
मुंबई्च्या लोकल ट्रेनने कामाला जाण्याचा अवघड टास्क केवळ मुंबईकरांना ठावूक असतो.कारण मुंबईतील लोकल ट्रेन एक मिनिट जरी लेट झाली तर...
Pahalgam Terror Attack: विजय देवरकोंडा संताप व्यक्त करत म्हणाला, ‘पाकिस्तानी लोकांना सर्वात आधी…’
‘काश्मीर आमचं आहे आम्ही येणारच…’ पहलगाम हल्ल्यानंतर अभिनेता थेट काश्मीरमध्ये, दाखवली तिथली परिस्थिती
पहलगाम हल्ल्याच्या 5 दिवसांनीच अतुल कुलकर्णी पोहोचला काश्मीरमध्ये; पाठ फिरवणाऱ्यांना खास आवाहन
“मी या जगातील सर्वांत बेकार व्यक्ती”, असं का म्हणाली आमिर खानची लेक?
weightloss tips: दहीमध्ये ‘हे’ 2 पदार्थ मिसळून खाल्ल्यामुळे वजन होईल झटपट कमी…
राज्यात 107 पाकिस्तानी बेपत्ता असल्याचा उपमुख्यमंत्री शिंदेंचा दावा, मुख्यमंत्री फडणवीसांना काढला खोडून