ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांनी आता…, गुलाबराव पाटील यांचा पुन्हा उद्धव ठाकरेंना टोला

ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांनी आता…, गुलाबराव पाटील यांचा पुन्हा उद्धव ठाकरेंना टोला

शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपली विचारधारा सोडली आहे, त्यांनी आपल्या पक्षाचे, वडिलांचे विचार सोडले आहेत, त्यांनी आता कोणाला मार्गदर्शन करण्याची गरज नाही. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची सुरुवात आता माझ्या शिवसेनेच्या बांधवांनो व भगिनींनो अशी होते. बाळासाहेबांच्या भाषणाची सुरुवात हिंदू माता भगिनींनो आणि मित्रांनो अशी होत होती. भाषणाच्या सुरुवातीचे वाक्य उद्धव ठाकरे यांनी गाडले आहे, त्यामुळे आता त्यांनी बाकीच्या गोष्टी बोलण्यात अर्थ नाही, असा टोला पाटील यांनी यावेळी लगावला आहे.

बाळासाहेबांच्या एआय भाषणावर प्रतिक्रिया देताना देखील त्यांनी जोरदार टोला लगावला आहे. ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांनी आता बाळासाहेबांचे भाषण दाखवून उपयोग नाही, बाळासाहेबांनी त्यावेळेस काय विचार मांडले होते. पक्ष कसा स्थापन केला होता? आणि आता आपण काय करतोय? त्यामुळे हे बाळासाहेबांचे भाषणं त्यांनीच आता पहावे असा टोला यावेळी गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. शिवसेनाप्रमुख हे दैवत आहेत आणि ते दैवत सर्वांचं आहे. पण ते वारसदार फक्त प्रॉपर्टीचे आहेत, त्यांच्या विचारांचे नाही. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असल्यामुळे जेवढं काम आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या काळात केलं नाही तेवढं आम्ही केलं आहे.  आदित्य ठाकरे यांनी आजोबांचा फोटो लावून स्वतःचं नाव लौकिक करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आम्ही आजोबांचं नाव उंचावलं आहे. आम्ही आजोबांचे विचार पुढे नेत आहोत, हाच आमचा आणि त्याच्यातील फरक आहे, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

शालेय अभ्यासक्रमात हिंदीच्या सक्तीवरून वातावरण चांगलंच तापलं आहे. मनसेनं या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर आता गुलाबराव पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत आशिष शेलार व शिक्षण मंत्र्यांनी खुलासा केलेला आहे. राज ठाकरे यांनी या गोष्टी समजून घ्याव्यात, त्यानंतर आपण निर्णय घेऊ, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

2019 पर्यंत भाजप चांगला, त्यानंतर महाराष्ट्रद्रोही कसा? मनसे नेत्याचे युतीच्या चर्चेमध्ये उद्धव ठाकरेंना डिवचणारे विधान 2019 पर्यंत भाजप चांगला, त्यानंतर महाराष्ट्रद्रोही कसा? मनसे नेत्याचे युतीच्या चर्चेमध्ये उद्धव ठाकरेंना डिवचणारे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवारी मोठ्या घडामोडी घडल्या. उद्धव ठाकरे यांची शिवसेना उबाठा आणि राज ठाकरे यांची मनसे एकत्र येण्याची चर्चा सुरु...
विलेपार्लेतील जैन मंदिर पुन्हा बांधणार? आता पुढचं पाऊल काय? वॉर्ड अधिकार्‍याच्या त्या आश्वासनानं जैन समाजाचं झालं का समाधान?
आता कुठं राज ठाकरे यांनी मन मोकळं केलंय..मग शिवसेनेची भूमिका काय? खासदार संजय राऊतांनी सांगितलं काय हवंय वचन?
‘…तर त्यांचं स्वागत’, राज, उद्धव ठाकरे युतीवर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंना मविआत एन्ट्री? काँग्रेसच्या बड्या नेत्यानं थेट सांगितलं..
उद्धव आणि राज यांची युती होणार का?…राजकीय नेत्यांनी काय दिल्या प्रतिक्रीया…
महाराष्ट्राच्या मारेकऱ्यांची सुपारी घेणारं हे सरकार आहे का?, उद्धव ठाकरे कडाडले