मुंबईकर नोकरदारांना सहा दिवस घरचा डबा बंद, काय आहे कारण?

मुंबईकर नोकरदारांना सहा दिवस घरचा डबा बंद, काय आहे कारण?

Mumbai Dabbawala: मुंबईत लाखोंच्या संख्येने नोकरदार आहेत. मुंबईतील दोन लाख नोकरदारांना सहा दिवस घरचा डबा बंद राहणार आहे. कारण मुंबईतील डबेवाले आता सहा दिवस सुट्टीवर चालले आहे. पांढरा पोशाख आणि पारंपारिक गांधी टोपी घालणारे मुंबईतील पाच हजार डबेवाला सहा दिवस गावी जाणार आहे. त्यामुळे ९ एप्रिलपासून सहा दिवस मुंबईतील डबेवाल्यांना घरचे जेवण मिळणार नाही. ९ ते १४ एप्रिलपर्यंतच्या सहा दिवसांच्या कालावधीत मुंबईतील बहुतांश डबेवाले आपापल्या गावांतील यात्रांमध्ये सहभागी होणार आहेत. १५ एप्रिलपासून पुन्हा एकदा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत हजर होतील.

डबेवाला या गावांमधील रहिवाशी

मुंबईतील नोकरदार वर्ग हा मोठ्या प्रमाणातील डबेवाल्यांच्या सेवांवर अवलंबून आहे. मुंबईत कार्यालयांमध्ये डबे पोहोचवण्याची करामत साध्य करणारे डबेवाले मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, या तालुक्यातील भागातील गावांमधून येतात. आता त्या गावांमध्ये ग्रामदैवत/ कुलदैवतांच्या यात्रा सुरू झाल्या आहेत. त्यात सहभागी होण्यासाठी मुंबईतील डबेवाले गावी जाणार आहेत. त्यामुळे ९ ते १४ एप्रिलपर्यंत डबे पोहोचवण्याची सेवा डबेवाल्यांनी बंद ठेवली आहे. या सहा दिवसांत रविवारच्या एका सुट्टीचा समावेश आहे. तसेच महावीर जयंती, हनुमान जयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती या सुट्ट्याही आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात डबेवाले दोन दिवस सुट्टी घेणार आहे. मंगळवार १५ एप्रिलपासून ही सेवा डबेवाले पुन्हा सुरू करणार आहे

पूर्वजांची कोडींग प्रणाली कायम?

उन्हाळी सुट्टीनिमित्ताने बहुतांश शाळा, कॉलेजला सुट्टी लागली आहे. तसेच सरकारी, निमसरकारी कर्मचारी वर्ग उन्हाळी सुट्टीवर गेला आहे. त्यामुळे मुंबईकरांची जास्त अडचण होणार नाही. खासगी अस्थापनांमध्ये काम करणाऱ्यांची अडचण होईल. १८९० पासून मुंबईत डबेवाले सेवा देत आहेत. डब्बेवाल्यांच्या पूर्वजांनी निर्माण केलेली कोडींग प्रणाली २१ व्या शतकातही प्रचलित आहे. त्यामुळे मुंबईकरांना कोणतीही चूक न होता घरचा डबा मिळत असतो. सुरुवातीला ही साधी कोडिंग होती. परंतु आता मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हर्बल या ३ लोकल ट्रेन मार्गांसह व्यापक ट्रेन असल्याने कोडिंग अल्फा न्यूमेरिक कॅरेक्टरमध्ये देखील विकसित झाले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘आता मुस्लीम झाले, पुढे ख्रिश्चन, पारशी अन्…’, जितेंद्र आव्हाड यांचं ते ट्विट चर्चेत ‘आता मुस्लीम झाले, पुढे ख्रिश्चन, पारशी अन्…’, जितेंद्र आव्हाड यांचं ते ट्विट चर्चेत
वक्फ सुधारणा विधेयकाला लोकसभा आणि त्यानंतर राज्यसभेत देखील मंजुरी मिळाली आहे, त्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते  जितेंद्र आव्हाड...
वक्फ विधेयकावरुन उद्धव ठाकरेंची काँग्रेसपेक्षा वेगळी चूल, थेट म्हणाले ‘आम्ही जाणार…’
‘ती चेटकिण, डायन…’ दिग्दर्शकाने केली श्रद्धा कपूरबद्दल अशी कमेंट; चाहते संतापले
अंकिता लोखंडे-विकी जैनवर आली कपल काऊन्सलिंगची वेळ; वैवाहिक आयुष्यात समस्या?
Chhaava OTT Release: ‘छावा’ सिनेमा OTT वर होणार प्रदर्शित, कधी, कुठे आणि कसा? घ्या जाणून
‘पहिल्यांदा योग्य काम केलं..’; मनोज कुमार यांच्या अंत्यसंस्कारातील अभिषेकच्या व्हिडीओवर कमेंट्स
सीनदरम्यान कपडे घसरले; दिग्दर्शकाने चित्रपटात दाखवला न्यूड सीन; अभिनेत्रीने आयुष्यच संपवलं