Ladki Bahin Yojana : आता त्या महिलांना पण मिळणार पैसे, महायुतीच्या मंत्र्याने दिली योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana : आता त्या महिलांना पण मिळणार पैसे, महायुतीच्या मंत्र्याने दिली योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून या योजनेच्या अमलंबजावणीला सुरुवात झाली. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. आतापर्यंत या योजनेंतर्गत एकूण 9 हाप्ते लाभार्थी महिलांना मिळाले आहेत. मात्र या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण पडत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच सरकार इतर योजनांचा पैसा हा लाडकी बहीण योजनेकडे वळवत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या योजनेबाबत आता उलट -सुलट चर्चा सुरू झाली आहे. मात्र काहीही झालं तरी ही योजना सुरूच राहणार असल्याचं राज्य सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान आम्ही पुन्हा जर सत्तेत आलो तर या योजनेतील लाभार्थी महिलांच्या हाफ्त्यामध्ये वाढ करू त्यांना दीड हजार रुपयांऐवजी 2100 रुपये दर महिन्याला देऊ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. दरम्यान राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं मात्र अजूनही या योजनेतील लाभार्थी महिलांना 2100 रुपये मिळालेले नाहीत, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या संदर्भात घोषणा होऊ शकते असा अंदाज लावण्यात येत होता, मात्र याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही, त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार याकडे आता अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.

यावर आता मंत्री संजय सावकारे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्व हाप्ते मिळालेले आहेत. जे रखडले आहेत, ते पुढच्या महिन्यात येऊन जातील. या योजनेमध्ये ज्या महिला बसत नव्हत्या, त्यांना अधिकचे पैसे दिले गेलेले आहेत. या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन जे राहिलेले आहेत, त्यांना या संदर्भात मदत करण्यात येईल, असं मंत्री संजय सावकारे यांनी म्हटलं आहे. एप्रिलचा हाप्ता देखील आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

EVM हॅक होऊ शकतं, अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तहेर विभागाच्या प्रमुखांचा दावा EVM हॅक होऊ शकतं, अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तहेर विभागाच्या प्रमुखांचा दावा
अलीकडेच अमेरिकन उद्योजक अब्जाधीश आणि ट्रम्प यांच्या सरकारमधील मंत्री एलॉन मस्क यांनी ईव्हीएममध्ये फेरफार केलं जाऊ शकतं असं म्हटलं होतं....
भर समुद्रात थरार; समुद्राच्या लाटांमुळे बोटीला पडले छिद्र, स्पीड बोटीमुळे वाचले 130 प्रवाशांचे प्राण
IPL 2025 – पहिलं गुडाळलं अन् मग चोपलं; CSK चा सुपडा साफ करत KKR चा मोठा विजय
‘तिकीट नही दिखाऊंगी, प्रधानमंत्री को ज्याके पुछ…,’ विदर्भ एक्सप्रेसमध्ये विनातिकीट महिला प्रवाशाचा धुमाकुळ
मोठा निर्णय आता शाळेतून शिवी हद्दपार, विद्यार्थ्याने शिवी दिली तर…
“फक्त स्पॉट दादा सोडून सर्वांसोबत…”, प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
खेळताना विहिरीत पडून सख्ख्या भाऊ बहिणीचा दुर्दैवी मृत्यू, शेख कुटुंबावर दु:खाचा डोंगर