जेव्हा हे टॉप बॉलीवूड अभिनेते कॅमेऱ्यासमोर ‘नग्न’ झाले…, कमावले कोट्यावधी रुपये
बॉलिवूडमध्ये आता बोल्ड सीनपासून ते इंटिमीट सीनपर्यंत सर्व काही सामान्य झालं आहे. बऱ्याच वेळा, पटकथेच्या मागणीमुळे, अनेक बॉलिवूड कलाकारांना असे सीन करावे लागतात पण त्याच सीनमुळे ते तेवढेच चर्चेतही येतात. पण काही चित्रपटात काही कलाकारांनी थेट नेकेड सीनही दिले आहेत. त्यामुळे या अभिनेत्यांना ट्रोलही केलं गेलं आहे पण त्यांच्या चित्रपटांनी तेवढी कमाई केली आहे. यात कोणते अभिनेते आहे ते पाहूयात.
रणबीर कपूर : सावरिया, अॅनिमल, पीके, संजू या चित्रपटात रणबीर कपूरने नेकेड सीन दिले आहेत. रणबीरने एकदा नाही तर अनेक वेळा स्क्रीनवर नेकेड सीन दिले आहेत. त्याने त्याच्या सावरिया या पहिल्याच चित्रपटात टॉवेल डान्स आणि नेकेड सीन देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. त्याचे ‘जब से तेरे नैना’ हे गाणे खूप लोकप्रिय झाले, परंतु चित्रपटाला मोठा फटका बसला. यानंतर, रणबीरने आमिरसोबत पीकेमध्ये एक कॅमिओ केला होता, त्यामध्येही तो नग्न दिसला होता. त्यानंतर त्याने संजू आणि अॅनिमल चित्रपटातही नेकेड सीन दिले आहेत.पण त्याचे हे चित्रपट जबरदस्त हीट ठरले.
आमिर खान: बॉलिवूड अभिनेता आमिर खाननेही त्याच्या पीके चित्रपटात नेकेड सीन दिला होता. या चित्रपटात त्याने एका एलियनची भूमिका साकारली होती. ज्या ग्रहावरून हा एलियन आला होता, तिथे कोणीही कपडे घातले नव्हते आणि कोणालाही आवाज नव्हता. हा चित्रपट आमिरच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक ठरला.
वरुण धवन: वरुण धवनने देखील भेडिया, सिटाडेल हनी बनी अशा बहुतेकदा व्यावसायिक चित्रपटांमध्ये नेकेड सीन दिलेले पाहायाला मिळाले आहेत. परंतु त्याने असे अनेक चित्रपट देखील केले आहेत जे लीगच्या बाहेर होते. असाच एक चित्रपट होता भेडिया. वरुणने ‘भेडिया’मध्ये अनेक नग्न सीन दिले आहेत. याशिवाय, वरुणने अमेझॉन प्राइमच्या सिटाडेल, हनी-बनीमध्य्ही एक नग्न सीन दिला आहे.
जॉन अब्राहम (न्यू यॉर्क): जॉनने त्याच्या कारकिर्दीत असे अनेक चित्रपट केले आहेत जे अपरिचित होते. न्यू यॉर्क त्यापैकी एक होते. हा चित्रपट बराच यशस्वी झाला. या चित्रपटात जॉनने अशा व्यक्तीची भूमिका साकारली आहे ज्याला खोट्या आरोपाखाली अटक केली जाते आणि नंतर बराच काळ एकांतवासात ठेवले जाते. या दृश्यांमध्ये जॉनने खूप छान काम केले आहे.
राजकुमार राव: राजकुमार राव किती व्हर्सटाइल अभिनेता आहे हे सर्वांना माहितच नाही. व्यावसायिक चित्रपट असोत किंवा अर्थपूर्ण कला चित्रपट, राजकुमारने नेहमीच स्वतःला सिद्ध केले आहे. त्याच्या कारकिर्दीतील असाच एक चित्रपट म्हणजे शाहिद, जो एका अतिशय संवेदनशील विषयावर आधारित आहे. या चित्रपटातील एका सविस्तर दृश्यासाठी राजने नेकेड शॉट दिला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला असला तरी पण समीक्षकांकडून त्याला भरपूर प्रशंसा मिळाली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List