कंगना राणौतचा नकार सहन झाला नाही, महेश भट्ट संतापले अन् सर्वांसमोर तिच्यावर चप्पल फेकली

कंगना राणौतचा नकार सहन झाला नाही, महेश भट्ट संतापले अन् सर्वांसमोर तिच्यावर चप्पल फेकली

बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत जे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमी चर्चेत असतात. त्यातीलच एक नाव म्हणजे कंगना राणौत. कंगना कोणत्याही विषयावर किती स्पष्टपणे बोलू शकते हे सर्वांना माहित आहे. कंगना राणौत तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि विधानांमुळे जास्त चर्चेत असते. कंगना आजही बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. तिने अनेकदा अशी विधानं केली आहेत ज्यासाठी तिला आजही ट्रोल केलं जातं.

कंगनाचा आज 38 वा वाढदिवस 

कंगनाने 2006 मध्ये ‘गँगस्टर’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. कंगना राणौत ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. कंगना आज म्हणजे 23 मार्च रोजी तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. तथापि, तिच्या चित्रपट कारकिर्दीत, अभिनेत्रीचे नाव अनेक वादांशी जोडले गेले आहे. तिच्या अफेअर्स आणि बॉलिवूडमधील अनेकांशी असलेले तिचे वाद हे आजही चर्चेत आहेत.

या अभिनेत्रीला तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. तिच्या 19 वर्षांच्या कारकिर्दीत, अभिनेत्रीने अनेक पुरस्कार जिंकले आहेत. त्यापैकी सर्वात खास म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार, या पुरस्काराने तिला चार वेळा सन्मानित करण्यात आलं.

चित्रपट नाकारला म्हणून महेश भट्ट संतापले

कंगना जस कोणतीही भीडभाड न ठेवता कोणत्याही अभिनेता, निर्माता किंवा दिग्दर्शकाबद्दल, अभिनेत्रींबद्दल अगदी स्पष्टपणे बोलते.अशाच पद्धतीने तिने प्रसिद्ध चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्यावर आरोपही केले होते. महेश भट्ट यांनी तिच्यावर चप्पल फेकली होती असा आरोप तिने केला होता.एवढंच नाही तर तिला स्वतःच्या चित्रपटाच्या प्रीमियरला जाण्यापासूनही रोखण्यात आलं होतं.

कंगनाला मारहाण करण्यासाठी उठले

कंगनाने एका मुलाखतीत तो प्रसंग सांगितला होता. ती म्हणाली जेव्हा तिचा ‘वो लम्हे’ चित्रपटचा प्रीमियर होणार होता, तेव्हा महेश भट्टने तिला एडिटिंग रूममध्ये बोलावले. तेव्हा त्यांनी तिला त्यांचा ‘धोखा’ चित्रपट ऑफर केला होता. पण कंगनाने काही कारणास्तव चित्रपट करण्यास नकार दिला. तिचा नकार सहन न झाल्याने महेश भट्ट खूप संतापले आणि तिला मारहाण करण्यासाठी उभे राहिले, परंतु नंतर पूजा भट्टने त्यांना थांबवलं.

कंगनाच्या अंगावर चप्पल फेकून मारली 

या घटनेनंतर, कंगना तेथून लगेच निघून गेली. तशीच कंगना तिच्या ‘वो लम्हे’च्या प्रीमियरला पोहोचली तेव्हा महेश भट्ट गेटवर आले आणि त्यांनी अभिनेत्रीवर चप्पल फेकली. आणि तेव्हापासून या दोघांमध्ये जो वाद आहे तो अद्यापर्यंत सुरुच आहे. अलिकडेच कंगना तिच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटामुळे चर्चेत होती. तथापि, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास पसंतीस उतरू शकला नाही. अभिनेत्री असण्यासोबतच, कंगना आता निर्माता आणि दिग्दर्शक म्हणूनही काम करते. तसेच तिने तिच्या गावी सुंदर असं रेस्टॉरंटही सुरु केलं आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईवर पाणबाणी? तब्बल 1500 टँकरचा पाणीपुरवठा ‘या’ दिवसापासून बंद; नेमकं कारण काय? मुंबईवर पाणबाणी? तब्बल 1500 टँकरचा पाणीपुरवठा ‘या’ दिवसापासून बंद; नेमकं कारण काय?
Mumbai Water Supply : सेंट्रल ग्राउंड वॉटर अथॉरिटीने घातलेल्या अटींची अंमलबजावणी मुंबईमध्ये लागू करण्यास सुरुवात झालेली असताना आता मुंबईवर पाणीबाणी...
वानखेडेवर विराट कोहली अन् सूरज चव्हाण समोरासमोर आले तेव्हा..; पहा व्हिडीओ
किराणा दुकानदारासोबत थाटला पहिला संसार, शमी देखील सोडली अर्ध्यावर साथ… हसीन जहाँचं वादग्रस्त खासगी आयुष्य
आता आधार कार्ड घेऊन फिरण्याची गरज नाही, QR कोडने काम झालं सोपं
पंतप्रधान मोदी अवतार, खासदार कंगना रनौतचे विधान
कही धुप कही छाव, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्राला अवकाळीचा इशारा; मुंबई तापणार
महिला वाहतूक पोलिसाने प्रसंगावधान राखत केले रक्तदान; 15 दिवसांच्या बाळाला जीवदान