Pune News – टँकरचालकाचा बेफिकिरपणा बालकाच्या जीवावर, रिव्हर्स घेताना मागच्या चाकाखाली आल्याने दोन वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Pune News – टँकरचालकाचा बेफिकिरपणा बालकाच्या जीवावर, रिव्हर्स घेताना मागच्या चाकाखाली आल्याने दोन वर्षाच्या मुलाचा मृत्यू

पुण्यातील वारजे परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सोसायटीत पाणी देऊन परतत असताना चालकाच्या नजरचुकीमुळे टॅंकरच्या मागच्या चाकाखाली येऊन दोन वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. वारजे येथील गणपती माथा परिसरात शनिवारी रात्री पावणेआठच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी टँकरचालकाविरोधात वारजे पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर टँकर वारजे येथील सोसायटीत पाणी देण्यासाठी आला होता. पाणी देऊन परत जाण्यासाठी रिव्हर्स घेताना ही घटना घडली. दोन वर्षांचा बालक टँकरच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वारजो पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चालकाला ताब्यात घेतले.

चालक गाडी मागे घेत असताना नागरिक त्याला हातवारे करुन इशारा करत होते. मात्र चालकाने त्याकडे दुर्लक्ष करत गाडी रिव्हर्स घेतली. बालकाचा मृतदेह शवविच्छेदन करून कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उन्हाळ्यात गव्हाच्या पीठात मिक्स करा ‘ही’ गोष्ट, पोट राहील थंड उन्हाळ्यात गव्हाच्या पीठात मिक्स करा ‘ही’ गोष्ट, पोट राहील थंड
उन्हाळ्यात शरीराला आतून थंड ठेवणे आणि पचनसंस्था निरोगी ठेवणे खूप महत्वाचे असते. कारण कडक सूर्यप्रकाश, वातावरणात उष्णतेच्या लाटा आणि वाढते...
Home Remedies For Acidity- उन्हाळ्यातील अ‍ॅसिडिटीवर हे आहेत घरगुती रामबाण उपाय! नक्की करुन बघा
Mango Juices- उन्हाळ्यात आंब्याचे हे चार ड्रिंक नक्की ट्राय करा
IPL 2025 – दोन्ही संघांची तुफान फटकेबाजी, अटीतटीच्या लढतीत लखनऊची बाजी; KKR चा 4 धावांनी पराभव
Coconut Water – उन्हाळ्यात नारळाचं पाणी टाळू नका, मिळतील 5 मोठे फायदे
Face Care- सकाळी उठल्यावर चेहऱ्यावरील सूज कमी करण्यासाठी या पदार्थांचा वापर आहे गरजेचा!
Kokan News – देवगड तालुक्‍यातील 72 सरपंच पदाचे सोडत पद्धतीने आरक्षण जाहीर!