Acid Attack – भाजप नेत्याच्या मुलीवर जीवघेणा हल्ला, घराच्या खिडकीतून अॅसिड फेकून आरोपी फरार
बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपच्या माजी जिल्हा अध्यक्षाच्या मुलीवर अॅसिड हल्ला केल्याची घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास तरुणीच्या खोलीतील खिडकीतून तिच्यावर अॅसिड फेकून आरोपींनी पोबारा केला. तरुणीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण होते.
बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष संजय सिंह राठोड यांच्या 24 वर्षाच्या मुलीवर हा हल्ला करण्यात आला. मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी तरुणीच्या खोलीतील खिडकीतून तिच्यावर अॅसिड फेकले. यानंतर आरोपी तेथून पसार झाले.
संजय सिंह यांनी तात्काळ पोलिसांनी याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता तरुणीच्या बेडवर अॅसिडचे डाग आढळले. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. हा हल्ला नेमका कुणी आणि कोणत्या कारणातून केला? याबाबत पोलीस तपास करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List