शहाजहाँ गार्डनचे नाव बदलून अहिल्याबाई होळकर ठेवा, भाजप मंत्र्यांची मागणी
आग्र्यातील प्रसिद्ध शहाजहाँ गार्डनचे नाव बदलून राणी अहिल्याबाई होळकर यांच्या नावावर ठेवावे अशी मागणी उत्तर प्रदेशच्या महिला व बाल कल्याण मंत्री राणी मौर्य यांनी केली आहे. मौर्य यांनी या मागणीचे पत्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिले आहे.
”मालवाच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी महिलांच्या विकासासाठी खूप काही केले आहे. आमच्या सरकारने देखील महिलांच्या विकासाला नेहमी प्राधान्य दिले आहे. ताजमहल व आग्र्याचा किल्ला यामध्ये असलेल्या शहाजहाँ गार्डनचे नाव बदलून जर अहिल्याबाळ होळकर ठेवले तर त्याने अनेक महिलांना प्रेरणा मिळेल. अशा प्रकारे नाव बदलण्यात काहीही चूक नाही, असे मौर्य म्हणाल्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List