पॅरा जंपिंगदरम्यान पॅराशुटमध्ये तांत्रिक बिघाड, हवाई दलातील पॅरा जंप प्रशिक्षकाचा जमिनीवर कोसळून दुर्दैवी मृत्यू

पॅरा जंपिंगदरम्यान पॅराशुटमध्ये तांत्रिक बिघाड, हवाई दलातील पॅरा जंप प्रशिक्षकाचा जमिनीवर कोसळून दुर्दैवी मृत्यू

प्रात्यक्षिक पॅरा जंपिंगदरम्यान पॅराशुटमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि ते उघडले गेले नाही. यामुळे भारतीय हवाई दलाच्या आकाश गंगा स्कायडायव्हिंग टीममधील एका पॅरा जंप प्रशिक्षकाचा मृत्यू झाला. शनिवारी 5 एप्रिल रोजी सकाळी नियमित सरावादरम्यान आग्रा येथे ही दुर्घटना घडली. रामकुमार तिवारी असे या प्रशिक्षकाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत. तिवारी यांच्यावर शासकीय इतमामात त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामकुमार तिवारी हे हवाई दलात पॅरा जंप प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. तिवारी हे शनिवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास आग्रा एअरबेसवर सराव करत होते. यावेळी नियोजित डेमो ड्रॉपदरम्यान तिवारी यांनी हेलिकॉप्टरमधून उडी घेतली. मात्र त्यांच्या पॅराशुटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते वेळेत उघडू शकले नाही. यामुळे तिवारी खाली कोसळून जखमी झाले.

तिवारी यांना तात्काळ लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान तिवारी यांची प्राणज्योत मालवली. हवाई दलाने तिवारी यांच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे. वॉरंट ऑफिसर तिवारी हे पॅराशूटिंग ऑपरेशन्समध्ये वर्षानुवर्षे अनुभव असलेले अनुभवी प्रशिक्षक होते. तांत्रिक बिघाडाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रत्नागिरी पोलीसांची धडक कारवाई, ब्राऊन हेरॉईनच्या 154 पुड्या आणि साडेपाच किलो गांजा जप्त रत्नागिरी पोलीसांची धडक कारवाई, ब्राऊन हेरॉईनच्या 154 पुड्या आणि साडेपाच किलो गांजा जप्त
अंमली पदार्थांचा रत्नागिरी जिल्ह्याला विळखा पडला आहे. तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत रत्नागिरी पोलीसांनी...
अमेरिकेने चीनवर लावला 104 टक्के टॅरिफ, ट्रम्प यांच्या निर्णयाचा चीनला मोठा फटका
‘त्या’ नराधमाने प्रेयसीच्या दुसऱ्या मुलीवरही केलेले लैंगिक अत्याचार
‘या सरकारने सगळं ढिले….,’ दीनानाथ हॉस्पिटलप्रकरणी काय म्हणाले जयंत पाटील
ज्येष्ठ चित्रपट निर्माते सलीम अख्तर यांचे निधन, सिनेविश्वावर शोककळा
IPL 2025 – धोनी धोनी… स्टेडियम दणाणलं पण CSK हरली, पंजाबचा 18 धावांनी विजय
‘मंगल’वार! शेअर बाजार सावरला!!