अँजिओप्लास्टीनंतर सैफची रुग्णालयाच्या स्टाफकडे अजब मागणी; आहारतज्ज्ञांकडून खुलासा

अँजिओप्लास्टीनंतर सैफची रुग्णालयाच्या स्टाफकडे अजब मागणी; आहारतज्ज्ञांकडून खुलासा

मुंबईतील लिलावती रुग्णालयातील आहारतज्ज्ञ ख्याती रुपानी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विविध सेलिब्रिटींचे किस्से सांगितले. अभिनेते ऋषी कपूर यांना रुग्णालयात शाकाहारी जेवण खावं लागल्याने ते वैतागले होते, असं त्यांनी सांगितलं. तर आई तेजी बच्चन यांच्यावरील उपचारादरम्यान अभिनेते अमिताभ बच्चन रुग्णालयाच्या स्टाफशी अत्यंत नम्रतेने वागत होते, असंही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी अभिनेता सैफ अली खानच्या एका अजब मागणीचा खुलासा केला. सैफवर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती, त्यावेळी त्याने ही मागणी केली होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी चाकूहल्ला झाल्यानंतरही तो याच रुग्णालयात दाखल होता.

रोनक कोटेचाला युट्यूबवर दिलेल्या मुलाखतीत ख्याती म्हणाल्या, “सैफ काही महिन्यांपूर्वी तिथे उपचारासाठी दाखल होता, हे मला माहीत आहे. परंतु काही वर्षांपूर्वी तो तिथे अँजिओप्लास्टीसाठी आला होता. जेवणात काही गोड पदार्थ का नाही, याबद्दल त्याची तक्रार होती. मी त्याला म्हणाले की, आताच तुझ्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्यामुळे मी तुला गोड खाण्याची परवानगी देऊ शकत नाही. तरीसुद्धा त्याची गोड खाण्याची इच्छा होती. अखेर मी किचनमध्ये गेले आणि सांगितलं की, त्याला नेहमीचे गोड पदार्थ देऊ नका. अखेर आम्ही त्याच्यासाठी कस्टर्ड आणि जेली बनवली होती.”

याच मुलाखतीत ख्याती यांनी सांगितलं की ऋषी कपूर यांना रुग्णालयात मांसाहार आणि त्यांच्या मनासारखं खायला न मिळाल्याने ते अत्यंत वाईट मूडमध्ये होते. “ऋषी कपूर यांच्या रोजच्या जेवणातील एखादा जरी पदार्थ नसला तरी ते निराश व्हायचे. तर दुसरीकडे नीतू सतत म्हणायच्या की, यांना ते खायला देऊ नका. त्यांना गुलाबजाम का खायला दिले? त्यामुळे ऋषी कपूर खूप निराश होते. मी त्यांच्यासाठी बरेच प्रयत्न केले, परंतु तरीसुद्धा ते डिस्चार्ज होताना नाराजच होते”, असा खुलासा ख्याती यांनी केला.

सैफ अली खानला 2007 मध्ये सौम्य हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी त्याला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अँजिओप्लास्टी झाल्यानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. “सैफ दिवसरात्र काम करत होता. त्यामुळे त्याचं शरीर खूप थकलं होतं. तो रविवारी मध्यरात्री दीड वाजता दक्षिण आफ्रिकेतून परतला होता आणि त्यानंतर लगेच स्टारडस्ट अवॉर्ड्ससाठी तो वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स याठिकाणी निघाला होता”, अशी माहिती त्यावेळी त्याची बहीण सोहा अली खानने दिली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘त्यांनी विद्यार्थ्यांना फोडाफोडीची अन् गद्दारीची…’; गुलाबराव पाटलांवर दानवेंचा हल्लाबोल ‘त्यांनी विद्यार्थ्यांना फोडाफोडीची अन् गद्दारीची…’; गुलाबराव पाटलांवर दानवेंचा हल्लाबोल
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  आम्ही जसे पक्षातील कार्यकर्ते फोडतो तसे...
आता तर केवळ सुरुवात…अजून किती तापणार? 2025 मध्ये मोडणार उष्णतेचा रेकॉर्ड?
पाईपवर चढून चौथ्या मजल्यावर गेला, खिडकीतून बिझनेसमॅनच्या घरात शिरला… पुढे जे घडलं ते पाहून पोलीसही चक्रावले
“मराठी खासदार तोंडात लाचारीचा बोळा घेऊन…” मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन पुन्हा मनसे आक्रमक, बॅनरने वेधलं लक्ष
PHOTO – सुधीर साळवींचे उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिनंदन
आंध्र प्रदेशात फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, 8 कामगारांचा होरपळून मृत्यू
मुर्शिदाबाद हिंसाचारासाठी मोदी, योगी आणि शहा जबाबदार, TMC चा आरोप