दिल्ली विमानतळ ‘टॉप 100’मध्ये
वाहतूक रेटिंग संस्था स्कायट्रक्स दरवर्षी जगभरातील टॉप 100 विमानतळांची यादी जाहीर करते. यंदाही स्कायट्रक्सने त्यांची यादी घोषित केली. त्यानुसार सिंगापूरच्या चांगी एअरपोर्टने एक नंबरची जागा कायम ठेवल्याचे दिसून येतंय. चांगी एअरपोर्ट हे पर्यटकांचे आकर्षण आहे. ‘टॉप 100’ यादीत दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाने 32 ने स्थान पटकावले आहे. गजबजलेले दिल्ली विमानतळ तिथले आधुनिक टर्मिनल्स, कलाकृती, चांगली कनेक्टिविटी आणि इमग्रिशेन सुविधेमुळे प्रवाशांच्या पसंतीस उतरलंय.
बंगळुरूच्या कॅम्पेगोवडा आंतरराष्ट्रीय विमानतळाला 48 वे स्थान मिळाले आहे. कॅम्पेगोवडा म्हणजे भरपूर मोकळी जागा, निसर्गसंपन्न परिसर अशी त्याची वैशिष्ट्ये आहेत. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाने 56 वे स्थान पटकावले आहे. या विमानतळावरील स्वच्छता आणि चांगले कर्मचारी या गोष्टी लक्षणीय आहेत. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला 73 वे स्थान मिळाले. मुंबई विमानतळ त्याची वास्तुविशारद रचना आणि कलात्मकता यासाठी लोकप्रिय आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List