प्लॅस्टिक उत्पादनात हिंदुस्थानचा फक्त 5 टक्के वाटा
जगाला पर्यावरणाबद्दल धडे देणाऱया अमेरिकेचे प्लॅस्टिक उत्पादनात सर्वाधिक योगदान आहे. 2022 या वर्षात जगात अंदाजे 26.8 कोटी टन प्लॅस्टिक कचरा निर्माण झाला. या प्लॅस्टिक उत्पादनात चीन आणि अमेरिका या दोन देशांचा अंदाजे 74 टक्के एवढा वाटा होता, तर हिंदुस्थानचा वाटा तुलनेने खूपच कमी असल्याचे आढळून आले. अहवालानुसार, 2022 मध्ये सुमारे 40 कोटी टन प्लॅस्टिकचे उत्पादन झाले होते. यामध्ये हिंदुस्थानचा वाटा फक्त 5 टक्के होता, तर अमेरिका 42 टक्के उत्पादनासह अव्वल आणि चीन 32 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी होता.
प्लॅस्टिक उत्पादनात अमेरिका आघाडीवर असली तरी चीन प्लॅस्टिकचा सर्वात मोठा ग्राहक आहे. चीन सर्वाधिक 20 टक्के प्लॅस्टिकचा वापर करतो. याबाबतीत अमेरिका 18 टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर युरोपियन युनियन 16 टक्के आणि हिंदुस्थान 6 टक्क्यांसह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहे.
अहवालानुसार, 2022 मध्ये अमेरिकेत प्रति व्यक्ती 216 किलो प्लॅस्टिकचा सर्वाधिक वापर झाला. जगभरातील 26.8 कोटी टन प्लॅस्टिक कचऱ्यापैकी चीनने सर्वाधिक 8.15 कोटी टन प्लॅस्टिक कचरा तयार केला. त्यानंतर अमेरिका (4.01 कोटी टन), युरोपियन युनियन (3 कोटी टन) आणि हिंदुस्थान (95 लाख टन) यांचा क्रमांक लागतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List