मुंबईची आर्थिक हत्या करून भाजप आसुरी आनंद घेतोय, आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

मुंबईची आर्थिक हत्या करून भाजप आसुरी आनंद घेतोय, आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

मुंबईची आर्थिक हत्या करून भारतीय जनता पक्ष आसुरी आनंद घेतोय, त्याला कुठेतरी रोखावेच घालेल, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. शिवसेनेचे मुंबईतील नेते, उपनेते, पदाधिकारी, युवासेना आणि महिला आघाडीची शिवसेना भवन येथे बैठक झाली. या बैठकीनंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

गेल्या सहा-सात महिन्यांपासून आम्ही मुंबईच्या पाणी प्रश्नाचा मुद्दा लावून धरलेला आहे. गढूळ पाणी असो कमी दाबाने सुटणारे पाणी असो किंवा ऐन उन्हाळ्यात टँकर असोसिएशनने पुकारलेला संप असो. टँकर असोसिएशनने एक आठवड्याची नोटीस देऊनही सरकार हलले नाही. मुंबई महापालिकेचे प्रशासक मुख्यमंत्र्यांच्या आदेशावर चालतात, मुंबईची आर्थिक हत्या होत असतानाही त्याकडे लक्ष दिले नाही, यासारखे दुर्दैव नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

टँकर असोसिएशनच्या संपावर तोडगा काढण्यासाठी आम्ही 48 तासांची डेडलाईन दिली होती. ही डेडलाईन आता संपत आली आहे. त्यामुळे या आठवड्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि मुंबईकर वॉर्ड ऑफिसवर मोर्चा काढून जाब विचारणार आहेत, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.

ते पुढे म्हणाले की, टँकर असोसिएशनच्या मागण्या गेल्या दोन-तीन वर्षापासून असून महाविकास आघाडीचे सरकार असताना केंद्राने लावलेली नियमावली आम्ही लागू करणार नाही असे सांगितले होते. काही शहरांमध्ये ती लागू होऊ शकते, तर काही नाही. त्यामुळे काही मागण्या रास्त आहेत. पण मुंबईची आर्थिक हत्या होते म्हणून बेस्टचे हाल, कचरा कर लावणे आणि पाण्याची समस्या निर्माण करून भाजप जो आसुरी आनंद घेतोय त्याला कुठेतरी रोखावे लागेल.

तिसऱ्या दिवशीही मुंबईकरांचे हाल, व्यावसायिकांची कोंडी; टँकरचालकांचा संप सुरूच

संपामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. गेले तीन दिवस महावीर जयंती, हनुमान जयंती आणि उद्या आंबेडकर जयंती साजरी करत असताना अनेकांच्या घरी पाणी नाही. मोठा विकेंड असल्याने अनेक मुंबईकर बाहेर गेल्याने थोडे सांभाळू शकतो, पण उद्या मुंबईकर कामावर रुजू होताना अंघोळीच्या पाण्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. अनेक हाय रेज सोसायट्यांना वाटते की एसआरएने पाणी घेतले, एसआरएला वाटते चाळींनी घेतले, चाळींना वाटते हाय रेज सोसायट्यांनी घेतले. यामुळे सामाजिक वाद निर्माण होऊ लागले असून अनेक इमारतींनी फायर टँकमधील पाणी वापरायला सुरुवात केली आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘आधी पटवलं मग केलं लग्न…’, शिंदेंच्या कोकणातील शिलेदाराची अनोखी लव्हस्टोरी, काय सांगितला अफलातून किस्सा? ‘आधी पटवलं मग केलं लग्न…’, शिंदेंच्या कोकणातील शिलेदाराची अनोखी लव्हस्टोरी, काय सांगितला अफलातून किस्सा?
कोकणातील एकनाथ शिंदे गटाचे मातब्बर नेते भरतशेठ गोगावले हे त्यांच्या बेधडक स्वभावामुळे ओळखल्या जातात. कोकणी माणसासारखे ते वरवर कडक वाटत...
लाडकी बहीण योजनेत आठ लाख महिलांना 1500 रुपयांऐवजी 500 रुपये मिळणार
सूर्यदेव कोपला, मुंबईत घामाच्या धारा, अनेक जिल्ह्यात पार वाढला, काम असेल तरच बाहेर पडा
मुस्लिम या देशात कायद्यात राहिले तर फायद्यात…धीरेंद्र शास्त्री महाराज नेमके काय म्हणाले?
‘नेहरूंकडून आंबेडकरांचा अपमान, तर मोदींकडून देवतुल्य स्थान’; बाबासाहेबांच्या जयंतीदिनी कंगना यांचं मोठं वक्तव्य
लॉरेन्स बिष्णोईनंतर सलमानचा नवीन दुश्मन कोण? ‘पांड्या’ने का पाठवला धमकीचा मेसेज?
घटस्फोटानंतर युजवेंद्र चहलचं ब्रेकअप? व्हिडीओ पोस्ट करत ‘ती’ म्हणाली, ‘जा तुला माफ…’