‘हिंदू वाचणार नाही जर…’, मिथुन चक्रवर्तींचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, नक्की काय आहे प्रकरण?
बॉलिवूडचे दिग्गज आणि प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पुढच्या वर्षी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला नाही, तर बंगालमध्ये हिंदू टिकणार नाहीत, असं वक्तव्य मिथुन यांनी केलं होत. ज्येष्ठ अभिनेते आणि नेत्याच्या अशा वक्तव्यामुळे बंगालचं राजकारण चांगलेच तापले आहे. अशा वक्तव्यानंतर तृणमूल काँग्रेसने मिथुन चक्रवर्ती यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
मिथुन चक्रवर्ती यांच्या अनेक सिनेमांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने निधी दिला असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आणि अशा व्यक्तीला हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलण्याचा अधिकार कसा आहे? असा प्रश्न उपस्थित केला.
रिपोर्टनुसार, तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस जयप्रकाश मजुमदार म्हणाले, ‘ते (मिथुन चक्रवर्ती) हिंदूंबद्दल बोलत आहेत? दाऊद इब्राहिम त्यांचा प्रायोजक होता हे ते विसरले आहे का? त्यांच्या अनेक चित्रपटांना दाऊदने निधी दिला होता आणि आता ते बंगालमध्ये येऊन हिंदूंना वाचवण्याविषयी बोलत आहेत…’
पुढे जयप्रकाश मजुमदार म्हणाले, ‘मिथुन चक्रवर्थी यांचे दाऊद इब्राहिम यांच्यासोबत खास कनेक्शन आहे. त्यांच्या अनेक सिनेमांना दाऊदने पैसे पुरवले आहेत. मिथुन राजकीय फायद्यासाठी जातीयवादी वक्तव्य करत आहेत. बंगाली हिंदू स्वातंत्र्यापासून शांततेने जगत आहेत, पण चक्रवर्ती यांचं विधान अत्यंत लाजिरवाणे आहे. त्यांचे शब्द द्वेषाने भरलेले आहेत आणि ते लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे.’
एवढंच नाही तर, मुंबईत असं वक्तव्य करण्याची तुमची हिंमत आहे का? असं म्हणत जयप्रकाश मजुमदार म्हणाले, ‘फिल्म इंडस्ट्रीबद्दल ते असं वक्तव्य करु शकतील का? मुसलमान सेलिब्रिटींना मुंबई फिल्म इंडस्ट्रीतून हटवा? असं चक्रवर्थी बोलू शकतील का?’ गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कोलकाता येथे पक्षाच्या प्रचारादरम्यान वादग्रस्त भाषण केल्याबद्दल मिथुन चक्रवर्थी यांच्या विरोधात दोन एफआयआर नोंदवण्यात आले होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List