Photo – वणव्याच्या घटनेनंतर दुर्गप्रेमींनी केली देवगिरी किल्ल्याची साफसफाई!
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबात येथील देवगिरी किल्ल्याजवळ मंगळवारी वणवा पेटला होता.
किल्ल्याच्या चारही बाजूने ही आग लागली होती आणि यात किल्ल्याचा परिसर जळून खाक झाला होता. देवगिरी किल्ल्यालाही या आगीची झळ पोहोचली होती.
या वणव्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील इटॅक छत्रपती संभाजीनगर चॅप्टर, संभाजीनगर फ्लॉगर्स आणि लोकसंवाद फाउंडेशनचे अमित देशपांडे, निखिल खंडेलवाल, प्रा. डॉ. राजेश करपे यांच्यासह दुर्गप्रेमींनी देवगिरी किल्ल्यावर पोहोचत साफसफाई केली.
देवगिरी किल्ल्यावर प्लास्टिकच्या बाटल्या, चिप्स, खाऊची पाकिट, तुटलेल्या चपला, शूज याचा मोठा कचरा जमा करण्यात आला.
अजूनही किल्ल्यावर काही प्रमाणात कचरा आणि स्वच्छतेची गरज आहे. पुरातत्व विभाग काहीतरी करेलच, पण इतिहासाचा उजाळा देत दुर्गप्रेमींनीही मोठ्या प्रमाणात किल्ल्यावर पोहोचावे असे आवाहन करण्यात आले आहे.
वणव्याच्या घटनेनंतर दुर्गप्रेमींनी केली देवगिरी किल्ल्याची साफसफाई! pic.twitter.com/5d7dhCddnM
— Saamana Online (@SaamanaOnline) April 13, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List