अमित शहा तुमच्यासाठी ती समाधी असेल, मात्र सर्व हिंदुस्थानींसाठी ती कबरच आहे – अतुल लोंढे
अमित शहा तुमच्यासाठी असेल ती समाधी हिंदुस्थानींसाठी, सर्व धर्मीयांसाठी ही कबर आहे. कारण महाराष्ट्रावर चालून आल्यानंतर एका क्रूरकर्म्याला कसा गाडण्यात आलं. त्याचा तो इतिहास आहे, असं म्हणत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता अतुल लोंढे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचण्यावर टीका केली आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त अमित शहा हे शनिवारी किल्ले रायगडावर आले होते. यावेळी रायगडावरून केलेल्या भाषणात शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, तसेच औरंगजेबाच्या कबरीला समाधी म्हणाले. यावरूनच लोंढे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना अतुल लोंढे म्हणाले की, “समाधी ही थोर पुरुष संत, महात्मा यांची असते, क्रूरकर्म्याची नाही. तुम्ही जे बोलले ते तुमच्या मनातलं आहे, शहा. आम्हीच आता देवेंद्र फडणवीस यांना विचारायचं आहे, यावर त्यांचं काय म्हणणं आहे?”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List