महाबळेश्वरात पर्यटकांना तीन दिवस टोलमाफी; पर्यटन विभागाचा निर्णय; 2 ते 4 मे दरम्यान अंमलबजावणी

महाबळेश्वरात पर्यटकांना तीन दिवस टोलमाफी; पर्यटन विभागाचा निर्णय; 2 ते 4 मे दरम्यान अंमलबजावणी

पर्यटन विभागाच्या वतीने 2 ते 4 मे दरम्यान होत असलेल्या महापर्यटन उत्सवात सहभागी होत असलेल्या पर्यटकांना प्रवेशकर व वाहनतळ फी माफ करण्यात आल्याची माहिती वाईचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी महाबळेश्वर येथे बोलताना दिली.

यावेळी राज्य पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक हनुमंतराव हेडे, तहसीलदार तेजस्विनी पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी अजय देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

महाबळेश्वर या पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणावर पर्यटक यावेत, यासाठी पर्यटनमंत्री देसाई यांच्या संकल्पनेतून महाबळेश्वर येथे 2 ते 4 मे या दरम्यान तीन दिवसीय महापर्यटन उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाची शासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. तब्बल 20 ते 22 वर्षांनी होत असलेला हा पर्यटन उत्सव यशस्वी व्हावा, यासाठी याची जबाबदारी संभाजीनगर येथील ई-फॅक्टर या खासगी इव्हेंट कंपनीला दिली आहे. उत्सवातील कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी शहरातील प्रमुख पदाधिकारी व नागरिकांची बैठक वाई प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी त्यांनी टोल माफ करण्यात आल्याची माहिती दिली.

राजेंद्र कचरे म्हणाले की, महापर्यटन उत्सव स्थानिक नागरिकांच्या सहकार्याशिवाय यशस्वी होणार नाही. म्हणूनच उत्सवाची माहिती देत मते जाणून घेणे आवश्यक आहे. महापर्यटन उत्सवाची माहिती सर्वदूर पोहचविण्यासाठी सर्वच मार्गांचा अवलंब करण्यात येणार आहे. रेडीओ, टीव्ही, वर्तमानपत्र या बरोबरच सोशल मीडिया यांचाही वापर करण्यात येणार आहे. टॅक्सी व लक्झरी बसेसवर जाहिरात करणारे स्टिकर लावण्यात येतील. शहरात कमानी उभारल्या जातील, तसेच मुंबई-बंगळुरू-गोवा या महामार्गावर होर्डिंग्ज लावली जातील. हॉटेलमध्येही स्वागत कक्षात उत्सवाची कार्यक्रमपत्रिका लावली जाईल. तीन दिवस आलेल्या पर्यटकांना एक किट देण्यात येईल. या किटमध्ये माहितीपत्रक असेल, अशी माहिती ई-फॅक्टर या इव्हेंट कंपनीच्या वतीने अनिकेत सराफ यांनी नागरिकांना दिली.

यावेळी झालेल्या चर्चेत माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, माजी सभापती संजय गायकवाड, राजेश कुंभारदरे, किसनशेठ शिंदे. अॅड. संजय जंगम, रवींद्र कुंभारदरे, गिरीश नायडू, गोपाळ लालवेग, सी. डी. बावळेकर, विजय भिलारे यांनी सहभाग घेतला. यावेळी युसूफ शेख, रमेश पलोड, रमेश कौल, किसन खामकर, सूर्यकांत जाधव, ऋषी वायदंडे, सी. डी. हेवे, नायब तहसीलदार दीपक सोनवले, विनोद सावंत, पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर, सहदेव भिसे उपस्थित होते.

वेण्णा लेक येथे तरंगता बाजार

आपल्या संस्कृतीबरोबरच पाश्चिमात्य संस्कृतीचा मिलाफ पाहावयास मिळणार आहे. वेण्णा लेक येथे तरंगता बाजार भरवला जाणार आहे. त्याचबरोबर सायंकाळी भव्य लेझर-शो तसेच ड्रोन-शो भरविण्यात येणार आहे. बाजारपेठेबरोबरच काही पॉइंटवर करमणुकीचे कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. तापोळा येथे जलक्रीडा, तर भोसे येथे साहसी खेळ खेळण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. पोलीस मैदानावर मोफत वाहनतळाची सोय करण्यात आली आहे, असेही राजेंद्र कचरे यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सलमानला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; करुणा शर्मांना वेगळाच संशय, केलं मोठं वक्तव्य सलमानला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; करुणा शर्मांना वेगळाच संशय, केलं मोठं वक्तव्य
अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, सलमानची गाडी बॉम्बने उडवून देऊ, सलमानच्या घरात घुसून त्यालाही...
वयाच्या १९ व्या वर्षी लग्न केले, दोनदा घटस्फोट; इस्लाम स्वीकारुनही भांडणे.. पोटगी न घेताच करतेय मुलीचा सांभाळ
सैफ अली खानचे भुतांनी झपाटलेले घर; रात्रीतून करावं लागलं रिकामं, सोहाने सांगितला भयानक किस्सा
‘अश्लीलता आहे ही…’ काजोलची बहीण तनिषाचा ड्रेस पाहून संतापले नेटकरी
उंदरांमुळे होतात हे धोकादायक आजार, एकदा नक्की वाचा
5 दिवसानंतर मुंबईकरांना दिलासा, टँकर चालक असोसिएशनचा संप अखेर मागे
IPL 2025 – थला फॉर नो रिझन… 55 हजार पाण्यात गेले, CSK च्या कामगिरीवर बच्चे कंपनी नाराज; Video व्हायरल