व्यंग आणि शिवीगाळ यात फरक आहे कुणाल कामराबद्दल पंजाबचे मुख्यमंत्री काय म्हणाले?
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शनिवारी टीव्ही9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे 2025’ च्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. तेव्हा त्यांनी कुणाल कामाराबद्दल त्यांनी काही व्यक्तव्य केली. ते म्हणाले की, “व्यंग आणि शिवीगाळ यात फरक आहे, देशात संयम कमी झाला आहे असं वाटतं. देशात संयमाचा अभाव आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून भावना भडकतात. राजू श्रीवास्तव लालूजींची खूप मिमिक्री करतात, त्यांनी अमिताभ बच्चन यांचीही मिमिक्री केली आहे. इथे काय घडलं आहे? छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे होतात. हे घडू नये. विनोद हा विनोद म्हणूनच घेतला पाहिजे” असं म्हणत त्यांनी कुणाल कामराची बाजू घेतली.
“माझ्याकडे पेन आहे आणि मी सिस्टम सुधारू शकतो”
तसेच जेव्हा त्यांना विचारलं गेलं की तुम्ही सरकारच्या दुसऱ्या बाजूला असताना एकंदरीत वातावरण तुम्हाला कसं दिसतं? तेव्हा ते म्हणाले “की जेव्हा मी विनोद करायचो तेव्हा मी फक्त टीव्ही आणि कार्यक्रमांमध्ये ते करायचो. त्यामुळे कोणीही व्यवस्था सुधारू शकत नाही, ते फक्त तिचे नुकसान करू शकतात.”
पुढे ते म्हणाले की, “आता फायदा असा आहे की आता माझ्याकडे पेन आहे आणि मी सिस्टम सुधारू शकतो. वयाच्या साडेसातव्या वर्षी सुपरस्टार बनवले. त्यानंतर, देवाने मला माझे उच्च करिअर सोडून या मार्गाचा पाठलाग करण्याचं धाडस दिलं. मी जे बोललो ते रेकॉर्डवर आहे. मी ते नाकारू शकत नाही. मी 2005 मध्ये सीडीमध्ये म्हटलं होतं की हे करायलाच हवं”
तुम्ही तुमचा मुद्दा खूप कमी शब्दात सांगू शकता.
सध्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल व्यंग्यकार काय म्हणू इच्छितात? तेव्हा सीएम मान म्हणाले की, “खूप मोठ्या गोष्टी खूप कमी शब्दात सांगता येतात. जर काही सांगायचे असेल तर ते कमी वेळात करता येईल”. तसेच त्यांनी म्हटलं की “मर्यादा ओलांडू नका. ओटीटी आले आहे. त्यात सरळ सरळ शिव्या दिल्या जातात. जर तिथे शिव्या दिल्या जात असतील तर आपण आपल्या कुटुंबासह हा प्रोग्राम कसं पाहू शकतो? ते आधी लहान मुलंही पाहणार आणि मग आपण.
सीएम मान यांनी ओटीटीबद्दल काय सांगितलं?
सीएम मान यांनी ओटीटीबद्दलही सांगितलं की, “भारतीय संस्कृती ही कुटुंबप्रिय आहे. कुटुंब बसून टीव्ही पाहते. टीव्हीमुळे कुटुंबे तुटली आहेत. मुलगा वेगळे कार्यक्रम पाहत असतो, वडील वेगळं काही पाहत असतात. शोमध्ये लोक टीआरपी मिळवण्यासाठी एकमेकांना शिवीगाळ करताना दिसतात. सेन्सॉरशिपऐवजी निर्माते किंवा दिग्दर्शकाने असे स्क्रिप्टच लिहू नये. ही आपली संस्कृती नाही.” असं म्हणत त्यांनी शोमध्ये होणाऱ्या शिवीगाळबद्दल आक्षेप व्यक्त केलं आहे.
दरम्यान शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून तसेच काँग्रेसवर होणाऱ्या टीकेवरूनही त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, “भाजप अजूनही लक्ष्य आहे. काँग्रेस कुठेच नाही. दिल्लीत काँग्रेस तिसऱ्यांदा शून्यावर आहे. तुम्हाला अजूनही वाटते का की काँग्रेस अस्तित्वात आहे? ते म्हणाले की, आम्ही अजूनही शेतकरी चळवळीसोबत आहोत.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List