आंध्र प्रदेशात फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, 8 कामगारांचा होरपळून मृत्यू
आंध्र प्रदेशातील अंकापल्ली जिल्ह्यात फटाके बनवणाऱ्या कारखान्यात रविवारी दुपारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात आठ कामगारांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्नीशमन दलाने अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवले. सदर कारखाना बेकायदेशीररित्या सुरू होता.
या स्फोटात काही कामगार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारखान्यात ठेवलेल्या गनपावडरच्या ढिगाऱ्याला आग लागली आणि स्फोट होऊ लागले. अपघात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांना रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी कारखान्यात 30 हून अधिक कामगार काम करत होते. बचाव पथकाने 20 हून अधिक लोकांना सुखरुप वाचवले. घटनास्थळी मदतकार्यासह शोध मोहीम अद्याप सुरू आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List