मुर्शिदाबाद हिंसाचारासाठी मोदी, योगी आणि शहा जबाबदार, TMC चा आरोप
पश्चिम बंगालच्या मुस्लिमबहुल मुर्शिदाबाद जिह्यात वक्फ (दुरुस्ती) कायद्याच्या निषेधार्थ हिंसक निदर्शने झाली. ज्यामध्ये 3 जणांना आपला जीव गमवावा लागला आणि अनेक जण जखमी झाले. तृणमूल काँग्रेस (TMC) हिंसाचाराच्या घटनांसाठी भाजपला जबाबदार धरत आहे. मुर्शिदाबाद हिंसाचारासाठी मोदी, योगी आणि शहा जबाबदार असल्याचं तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा म्हणाले आहेत.
वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना टीएमसीचे आमदार मदन मित्रा म्हणाले की, ‘भाजप नेते चुकीची माहिती पसरवून बंगालमध्ये हिंसाचार घडवू इच्छितात.” ते म्हणाले, “देशात जे काही दंगली होत आहेत त्यासाठी अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ जबाबदार आहेत. जर या प्रकारच्या हिंसाचारात कोणी जीव गमावत असेल तर ते चुकीचे आहे. जोपर्यंत ममता बॅनर्जी आहेत, तोपर्यंत बंगालमध्ये कुठेही हिंसाचार होऊ शकत नाही. ममता बॅनर्जी सर्वांना सोबत घेऊन चालल्या आहेत.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List