शेतकऱ्यांशी गद्दारी करणाऱ्या महायुती सरकारविरोधात महाविकास आघाडीची निदर्शने,शिंदे यांना काळे झेंडे दाखवले

शेतकऱ्यांशी गद्दारी करणाऱ्या महायुती सरकारविरोधात महाविकास आघाडीची निदर्शने,शिंदे यांना काळे झेंडे दाखवले

शक्तिपीठ महामार्ग, कर्जमाफीबद्दल निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनांवरून आता घूमजाव करत शेतकऱयांशी गद्दारी केली आहे. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संतप्त शेतकऱयांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली गनिमी काव्याने काळे झेंडे, ऊस दाखवून महायुती सरकारचा निषेध केला.

विधानसभेच्या प्रचारावेळी कोल्हापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करतो, असे सांगितले होते. तसे अध्यादेशही काढल्याचे सांगितले गेले. तसेच निवडून आल्यानंतर शेतकऱयांना कर्जमाफी देणार असल्याचे आश्वासनही दिले होते. मात्र सत्तेत आल्यानंतर महायुती सरकारने घूमजाव केले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा यांचे विडंबनात्मक गाणे वाजवून विरोध करण्याचा इशारा शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने दोन दिवसांपूर्वी दिला होता. या पार्श्वभूमीवर मध्यरात्रीपासूनच महाविकास आघाडीच्या नेत्यांसह 200हून अधिक आंदोलकांची धरपकड करण्यात आली, तर समन्वयक गिरीश फोंडे यांना काल सायंकाळी महानगरपालिका शाळेतील नोकरीवरून निलंबित करण्यात आले. मध्यरात्री पोलिसांनी सर्च वॉरंट काढून शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांच्या घराची झडती घेऊन महाविकास आघाडीच्या आंदोलकांवर दडपशाही सुरू केली होती.

दरम्यान, महायुती व इंडिया आघाडी तसेच शेतकऱयांचे हे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कारवाईदरम्यान कागल तालुक्यातील व्हनूर गावच्या महिला सरपंच पूजा मोरे यांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले.

आंदोलकांवरील दडपशाही हा लोकशाहीचा खून – विजय देवणे

लोकशाही व शांततेच्या मार्गाने शक्तिपीठ महामार्ग तसेच कर्जमाफीवरून शेतकऱयांवर होणाऱया अन्यायाबद्दल दाद मागण्यासाठी लक्षवेधी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. पण, महायुती सरकारने दडपशाही दाखवून दिली. मध्यरात्री आपल्या घराची सर्च वॉरंट काढून झडती घेण्यात आली. तसेच महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या आंदोलकांचीही धरपकड करून ताब्यात घेण्यात आले. आंदोलकांवर अशी दडपशाही हा एकप्रकारे लोकशाहीचा खूनच आहे, असा हल्लाबोल शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी केला.

शिक्षक गिरीश फोंडे तडकाफडकी निलंबित

शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांना पालिकेच्या सहाय्यक शिक्षक पदावरून शुक्रवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. कोल्हापूर जिह्यात सुरू असलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या धोरणात्मक निर्णयांविरुद्ध बोलणे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱयास विरोध करण्याच्या त्यांच्या कृतीमुळे मुंबईतून कोल्हापूर पालिका आयुक्तांना आदेश देत त्यांचे निलंबन करण्यात आले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

2019 पर्यंत भाजप चांगला, त्यानंतर महाराष्ट्रद्रोही कसा? मनसे नेत्याचे युतीच्या चर्चेमध्ये उद्धव ठाकरेंना डिवचणारे विधान 2019 पर्यंत भाजप चांगला, त्यानंतर महाराष्ट्रद्रोही कसा? मनसे नेत्याचे युतीच्या चर्चेमध्ये उद्धव ठाकरेंना डिवचणारे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवारी मोठ्या घडामोडी घडल्या. उद्धव ठाकरे यांची शिवसेना उबाठा आणि राज ठाकरे यांची मनसे एकत्र येण्याची चर्चा सुरु...
विलेपार्लेतील जैन मंदिर पुन्हा बांधणार? आता पुढचं पाऊल काय? वॉर्ड अधिकार्‍याच्या त्या आश्वासनानं जैन समाजाचं झालं का समाधान?
आता कुठं राज ठाकरे यांनी मन मोकळं केलंय..मग शिवसेनेची भूमिका काय? खासदार संजय राऊतांनी सांगितलं काय हवंय वचन?
‘…तर त्यांचं स्वागत’, राज, उद्धव ठाकरे युतीवर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंना मविआत एन्ट्री? काँग्रेसच्या बड्या नेत्यानं थेट सांगितलं..
उद्धव आणि राज यांची युती होणार का?…राजकीय नेत्यांनी काय दिल्या प्रतिक्रीया…
महाराष्ट्राच्या मारेकऱ्यांची सुपारी घेणारं हे सरकार आहे का?, उद्धव ठाकरे कडाडले