‘स्त्रीचा जन्म म्हणजे अभिशाप आणि ती गरीब असले तर…’, प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य
अभिनेत्री नीना गुप्ता यांनी 2023 मध्ये स्त्रीवादावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे सर्वत्र वातावरण तापलं होतं. आता देखील नीना गुप्ता यांनी स्त्रीवादावर लक्षवेधी वक्तव्य केलं आहे. महिलांनी नोकरी केली तर, त्यांच्या बलात्कार होतो. एवढंच नाही तर, स्त्रीचा जन्म म्हणजे अभिशाप… असं वक्तव्य देखील नीना गुप्ता यांनी केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नीना गुप्ता यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, एका पॉडकास्टमध्ये नीना गुप्ता म्हणाल्या होत्या, स्त्रीवादासारख्या गोष्टींवर मला विश्वास नाही. पुरुष आणि स्त्रिया समान नाहीत आणि त्यांची तुलना करू नये. महिलांना पुढे जाण्यासाठी पुरुषांची गरज असल्याचेही नीना यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
आता नुकताच झालेल्या एका मुलाखतीत नीना गुप्ता यांनी स्त्रीवादावर मोठं वक्तव्य केलं आहे. ‘यावर मला कोणतंच वादग्रस्त वक्तव्य केलेलं नाही. कारण माझ्या म्हणण्याचा अनर्थ केला जोते. माझ्यासाठी, स्त्रीवाद म्हणजे सशक्त आणि खंबीर असणे होय. माझ्यासाठी हेच स्त्रीवाद आहे…’
देशाच्या महिलांसाठी तुम्हाला काय हवं आहे? यावर नीना गुप्ता म्हणाल्या, ‘मला जे हवं आहे ते शक्य नाही. मला असं वाटतं की महिला सुरक्षित झाल्या पाहिजे आणि ते शक्य नाही. सांगतात महिलांना शिक्षित करा. जर तुम्ही महिलांना शिक्षित केलं तर त्या नोकरी करतील आणि त्यांचा बलात्कार होईल.
मला असं वाटतं स्त्रीचा जन्म म्हणजे अभिशाप आहे आणि महिला गरीब असेल तर, तिची परिस्थिती आणखी वेदनादायी असते. मला वास्तव माहिती आहे. त्यामुळे आशावादी राहण्यात देखील काही अर्थ नाही. तो एक शाप आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलांचे काय होते? मला उपाय हवा आहे, पण मी कोणत्याही उपायाचा विचार करू शकत नाही.’ असं देखील नीना गुप्ता म्हणाल्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List