‘मराठीला गोळी मारा’ नायगावमध्ये सोसायटी सेक्रेटरीचे वादग्रस्त वक्तव्य; महिलेला जातीवाचक शिवीगाळ

‘मराठीला गोळी मारा’ नायगावमध्ये सोसायटी सेक्रेटरीचे वादग्रस्त वक्तव्य; महिलेला जातीवाचक शिवीगाळ

राज्यात मराठीची गळचेपी होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. आता अशीच एक घटना नायगावमध्ये घडली आहे. आर्थिक अडचणूमुळे मेंटेनन्स भरला नसल्याने घरातील पाण्याचा पुरवठा बंद केल्यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या मराठी महिलेला नायगावमधील एका सोसायटीतील सेक्रेटरीने जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना उघडकीस आली आहे.महिलेने याबाबतची तक्रार दाखल केली आहे. तसेच या सेक्रेटरीने ‘मराठीला गोळी मारा’ असं मराठीचा अपमान करणारे वक्तव्यही केले आहे. नायगाव पूर्व येथील रोशन पार्क सोसायटीमध्ये राहणाऱ्या स्वीटी मांडवकर या महिलेने वसई पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल केली आहे.

नायगाव पूर्व येथील रोशन पार्क सोसायटीत राहणाऱ्या स्वीटी नथुराम मांडवकर या महिलेने सोसायटीचे मेंटेनन्स भरले नसल्याने त्यांच्या घरचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. सेक्रेटरीकडे त्याची विचारणा करण्यासाठी गेल्यावर त्याने महिलेला ‘मराठीला गोळी मारा’ असे वादग्रस्त वक्तव्य केले. तसेच महिलेला त्यांनी जातीवाचक शिवीगाळही केली आहे. स्वीटी नथुराम मांडवकर यांनी त्यांची डिलिव्हरी झाल्यामुळे तसेच घरात चोरी झाल्याने आर्थिक अडचणीमुळे सोसायटीचे मेंटेनन्स भरले नव्हते. त्यामुळे सोसायटीने त्यांचे पाणी बंद केले. या सोसायटीमध्ये 91 फ्लॅट्स असून अनेक जणांची थकबाकी राहिली आहे. तरीदेखील केवळ आपल्यावरच कारवाई करण्यात आल्याची तक्रार महिलेने केली आहे.

यासंदर्भात विचारणा करण्यासाठी त्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये गेल्या असता त्यांनी सेक्रेटरीला नोटीस मराठीत द्या, अशी मागणी केली. यावर सेक्रेटरीने संतापून ‘मराठीला गोळी मारा’ असे अपमानजनक वक्तव्य केले. याबाबत मांडवकर यांनी वसई पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. सोसायटीतील काही सदस्य त्यांना मानसिक त्रास देत असल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. सेक्रेटरीने आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेत तुम्ही मराठी लोकांनी फ्लॅट विकून जा, नाहीतर तुमचा आम्ही मानसिक आणि शारीरिक छळ करू अशी धमकी दिली. कमिटीच्या सदस्यांकडून आपल्या घरातील लहाण मुलांवर जादूटोणा केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली असली तरी कमिटीकडून ते दिले जात नाही, असेही महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भरूच टोलनाका सर्वाधिक कमाईचा! 10 टोलनाक्यांतून सरकारने कमावले 14 हजार कोटी भरूच टोलनाका सर्वाधिक कमाईचा! 10 टोलनाक्यांतून सरकारने कमावले 14 हजार कोटी
देशात रस्ते, महामार्गाचे जाळे पसरत चालले आहे. त्यामुळे टोल प्लाझामध्ये होणारी कमाई वाढत आहे. सरकारने संसदेत टोल करातून होणाऱ्या कमाईचे...
रेड अलर्ट दिला, पण पाऊस नाही पडला! वेधशाळेचा अंदाज निम्म्या वेळा चुकला, हवामानापेक्षा आयएमडीचा कारभार अधिक लहरी
दुसऱ्या बँकेचे एटीएम वापरणे महागणार
कुनो नॅशनल पार्कमधील पाच चित्त्यांवर हल्ला; गावकऱ्यांची दगड-काठ्यांनी मारहाण
Who is Vipraj Nigam – आयपीएलमध्ये लखनऊविरुद्ध ‘भोकाल’ उडवणारा विपराज निगम कोण आहे?
लक्षवेधक – व्हिसा शुल्कात वाढ, यूकेचा प्रवास महागणार
ऑनलाईन गेमिंगच्या 357 वेबसाईट बंद