CIDमधील ACP प्रद्युम्न यांचा प्रवास खरंच संपणार? शिवाजी साटम यांनीच सांगितलं सत्य…
CID मालिकेला वेगळ्या परिचयाची गरज नाही. सुमारे 20 वर्षांपासून सुरू असलेला हा प्रसिद्ध हिट थ्रिलर शो प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग आहे. खरे तर या शोमधील सर्वच पात्रांचे लोकांच्या हृदयात स्वतःचे वेगळे स्थान आहे. पण प्रत्येक मुलाला सीआयडीचे एसीपी प्रद्युम्न हे खूप आवडतात. पण या मालिकेतील CIDचे ACP प्रद्युम्न म्हणजेच शिवाजी साटम यांच्या व्यक्तिरेखेचा ट्रॅक मालिकेमध्ये संपणार असल्याची अटकळ अलीकडे बांधली जात होती. या बातमीने चाहत्यांची निराशा झाली होती. मात्र आता यावर खुद्द शिवाजी साटम यांनीच या वृत्तांवर मौन सोडले आहे.
एका वृत्तपत्राशी बोलताना, शिवाजी साटम यांनी सीआयडीमध्ये एसीपी प्रद्युम्न यांच्या व्यक्तिरेखेचा ट्रॅक संपण्याबाबतच्या बातम्यावर प्रतिक्रिया दिली. माझा ट्रॅक संपणार आहे का, याबाबत मला कोणतीही माहिती नाही, असे शिवाजी साटम यांनी सांगितलं. मी शोमधून ब्रेक घेतला आहे आणि या शोमध्ये पुढे काय होईल हे मेकर्सनाच माहीत आहे. मी प्रत्येक गोष्ट माझ्या स्वभावानुसारही घ्यायला शिकलो आहे, आणि जर (मालिकेतला) माझा ट्रॅक संपला तरी मला काहीच प्रॉब्लेम नसेल, असंही त्यांनी नमूद केलं.
शिवाजी साटम यांचा CID तून ब्रेक
सीआयडी सुरू झाल्यापासूनचया शोचा एक भाग असलेले शिवाजी साटम म्हणाले की, मला ट्रॅकच्या शेवटाविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ते सध्या शोचे शूटिंग करत नाहीयेत. शिवाजी साटम यांच्या सांगण्यानुसार, त्यांनी सध्या त्यांच्या मुलासोबत वेळ घालवण्यासाठी मे महिन्यात सुट्टी घेतली आहे. गेल्या 22वर्षांपासून मी एसीपी प्रद्युम्न यांची भूमिका साकारण्याचा आनंद घेत आहे, मला या मालिकेने बरंच काही दिलं, असं ते म्हणाले.
कुटुंबासह घालणावर वेळ
सध्या मी फक्त ब्रेक घेतला आहे आणि माझ्या आयुष्याचा आनंद लुटणार आहे. मी कठोर परिश्रम केले आहेत आणि प्रत्येकाजण विश्रांतीसाठी पात्र असतो, असं त्यांनी सांगितलं. आता माझं पात्र (एसीपी प्रद्युम्न) हे मालिकेत पुन्हा दिसेल की नाही याबाबत मला खात्री नाही, असं त्यांनी नमूद केलं. एका रिपोर्टनुसार, सीआयडीमध्ये बॉम्बस्फोटानंतर मृत्यू झाल्यानंतर शिवाजी साटम यांचं एसीपी प्रद्युम्न यांच्या पात्राचा ट्रॅक (मालिकेत) संपणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List