वर्षभरात 48 हजार मुंबईकरांची दक्षिण आफ्रिकेला भेट
2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेला भेट देणाऱया 75,541 पर्यटकांमध्ये तब्बल 63.6 टक्के पर्यटक म्हणजे जवळपास 48 हजार मुंबईकरांचा समावेश होता, अशी माहिती अॅन्युअल इंडिया रोड शोदरम्यान साऊथ आफ्रिकन टुरिझमतर्फे देण्यात आली. या वेळी साऊथ आफ्रिकन टुरिझमच्या आशिया, ऑस्ट्रेलिया, मध्य-पूर्व भागांतील प्रादेशिक महाव्यवस्थापक ग्कोबानी मांकोतायवा उपस्थित होते. दक्षिण आफ्रिका 2025 मध्ये जी-20 अध्यक्षपद स्वीकारण्यास सज्ज असून जागतिक प्रवास सहयोग जोपासण्यामध्ये तसेच शाश्वत वाढीला चालना देण्यामध्ये पर्यटन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. 40 प्रदर्शकांनी विविध प्रकारच्या ऑफर्स सादर करण्यासह या रोड शोमध्ये मुंबईतील 500 हून अधिक ट्रव्हल ट्रेड एजंट्सचा उत्साहपूर्ण सहभाग दिसण्यात आला. भारत ही दक्षिण आफ्रिकेतील पर्यटनासाठी उच्च प्राधान्य दिली जाणारी बाजारपेठ आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List