IPL 2025 – जॉस बटलरची झुंजार अर्धशतकीय खेळी, गुजरातने RCB चा केला 8 विकेटने पराभव

जॉस बटलरने धुवाँधार फलंदाजी करत गुजरातला विजय मिळवून देण्यात खारीचा वाटा उचलला आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या या अटीतटीच्या लढतीत बंगळुरूने गुजरातला 170 धावांचे आव्हान दिले होते. आव्हानाच पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या गुजरातने आक्रमक सुरुवात करत तोडफोड फटकेबाजी केली. कर्णधार शुममन गिल व्यतिरिक्त सर्वच फलंदाज बंगळुरूच्या गोलंदाजांवर चांगलेच बरसले. साई सुदर्शनने 49 धावांची सलामी देत विजयाचा पाया रचला. त्यानंतर आलेल्या बटलरने 39 चेंडूंमध्ये 6 खणखणीत षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 73 धावा चोपून काढल्या. बटलरला रूदरफोर्डची चांगली साथ मिळाली त्यानेही हात धुवून घेत 18 चेंडूंमध्ये 3 षटकार 1 चौकार मारत 30 धावांची वादळी खेळी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News

Comment List