आग्रा येथे छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक, शासन आदेश जारी
छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आग्रा येथून निसटले होते. तो शिवप्रताप आता आग्रा येथे त्याच स्थळी भव्य स्मारकाच्या रूपात भविष्यात जगासाठी लक्षवेधी ठरणार आहे.आग्रा येथे छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक उभारले जाणार आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला असून या स्मारक उभारणीची जबाबदारी पर्यटन विभागाकडे सोपवण्यात आली आहे.
आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवजयंतीला केली होती. औरंगजेबाने शिवरायांना जिथे कैद करून ठेवले होते ती जागा शिवरायांच्या स्मारकासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून अधिग्रहीत केली जाणार आहे. शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे संग्रहालयही तिथे उभारले जाणार आहे.
पर्यावरण विभागाकडे जबाबदारी
या स्मारक उभारणीसाठी पर्यटन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास तज्ञांची स्वतंत्र समिती स्थापन केली जाणार आहे. स्मारक व संग्रहालय अद्ययावत तंत्र आणि सोयीसुविधांनी युक्त असेल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List