‘डाळ पुरावी म्हणून जास्त पाणी घालायचो…’ शाहरुख खानने सांगितला तो बालपणीचा संघर्ष
बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानला कोणत्याही ओळखीची आवश्यकता नाही. त्याने जे काही मिळवलं ते त्याच्या कष्टाने मिळवलं. त्याच्या संघर्षाबद्दल सर्वांना माहित आहे. तो जे काही आता बॉलिवूडवर राज्य करतो ते फक्त त्याच्या मेहनतीच्या जोरावर. शाहरुख खान आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. तसेच त्याच्याकडे आज करोडोंची प्रॉपर्टी आहे. एवढं लक्झरिअस आयुष्य जगणाऱ्या किंग खानची परिस्थिती तो लहान असताना मात्र म्हणावी तेवढी चांगली नव्हती.
“घरी एवढी गरीबी होती की जेवण करताना त्याची आई डाळीमध्ये भरपूर पाणी ओतायची”
त्याने अनेक मुलाखतींमध्ये याबद्दल उल्लेख केला आहे. त्याच्या घरी एवढी गरीबी होती की जेवण करताना त्याची आई डाळीमध्ये भरपूर पाणी ओतायची. जेणेकरून ती डाळ संपूर्ण कुटुंबाला पुरेल म्हणून. त्याने त्याच्या कुटुंबाबद्दल अनुपम खेर यांच्या मुलाखतीमध्ये त्याच्या बालपणीच्या काही आठवणी सांगितल्या. तसेच त्याने कोणत्या हालाखीच्या परिस्थितीत दिवस काढले हे देखील सांगितले.
किंग खानचे बालपण अत्यंत गरिबीत गेले
किंग खानचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. एकदा अनुपम खेर यांच्या चॅट शोमध्ये त्याने आपल्या प्रामाणिकपणाने लाखो लोकांच्या मनाला स्पर्श केला होता. चॅट शो दरम्यान, किंग खानने त्याच्या त्रासदायक बालपणाबद्दल सांगितलं. त्याने म्हटलं होतं की, “मी जिथून आलो आहे, तिथे आमच्या घरात डाळीत अतिरिक्त पाणी मिसळले जात होते जेणेकरून आम्ही चार लोक ती डाळ खाऊ शकू. तेव्हा कोणालाही कल्पना नव्हती किंवा वाटलं नव्हतं की मी या टप्प्यावर पोहोचेन. जर माझ्यासारखा मर्यादित दिसणारा माणूस या टप्प्यावर पोहोचू शकला तर काहीही होऊ शकतं”
शाहरुख खान 25 वर्षांचा होईपर्यंत त्याची आईच त्याला जेवण भरवत असे
2018 मध्ये देखील एका वेगळ्या मुलाखतीत, शाहरुखने त्याच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या होत्या. “मी लहान असताना मला नेहमीच मोठं व्हायचं होतं आणि आता मी मोठा झालो आहे, मला माझ्या बालपणीची मला खूप आठवण येते. मला वाटतं की तेव्हा आम्ही इतके निश्चिंत होतो तो आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ होता. मला आठवतं की माझी आई मला बराच काळ तिच्या हाताने जेवू घालत असे. मी 25 वर्षांचा होईपर्यंत. म्हणून, मी अजूनही आजारी आहे…”
शाहरूखचे त्याच्या पालकांशी नाते कसे होते?
शाहरूखचे त्याच्या पालकांशी असलेले नाते हे प्रेमाने भरलेले होते. त्याचे वडील ताज मोहम्मद खान हे पठाण होते जे पेशावरहून भारतात आले आणि शाहरुख फक्त 15 वर्षांचा असताना कर्करोगाने त्यांचे निधन झाले. त्यांची आई लतीफ फातिमा खान यांचे 1990 मध्ये दीर्घ आजाराने निधन झालं.पण अजूनही शाहरूख त्याच्या आईला तेवढंच मानतो आणि त्यांची आठवण काढतो.
‘किंग’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त
शाहरुख खानच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झालं तर, तो सध्या ‘किंग’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तो त्याची मुलगी सुहाना खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजॉय घोष यांनी केले आहे. अभिषेक बच्चन देखील ‘किंग’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. चाहते शाहरुख खानच्या ‘किंग’ची आतुरतेने वाट पाहत आहेत .
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List