सोनाक्षी सिन्हाला होळीवरून का ट्रोल केलं जातंय? झहीरवरून नेटकऱ्यांची टीका
होळीचा सण हा सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच एन्जॉय केला. सेलिब्रिटींनीही त्यांच्या होळीचे सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. पण एका अभिनेत्रींला याच होळीच्या फोटोंवरून ट्रोल करण्यात आलं. ही बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे सोनाक्षी सिन्हा. इंस्टाग्रामवर तिने तिचे होळी खेळतानाचे तिचे फोटो पोस्ट केले पण याच फोटोंमुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
झहीर इक्बालवरून ट्रोल
फोटोंमध्ये सोनाक्षी एकटीच होळी खेळताना दिसत आहे. तिचा नवरा झहीर इक्बाल तिच्यासोबत दिसत नसल्याने नेटकऱ्यांनी तिच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. ती एकटीने होळी साजरी करताना पाहून सोशल मीडियावरील ट्रोलर्सनी एकामागून एक अनेक प्रश्न विचारण्यास आणि कमेंट्स करण्यास सुरुवात केली.
सोनाक्षी सिन्हाने 23 जून 2024 रोजी तिचा जुना प्रियकर झहीर इक्बालसोबत लग्न केलं. दोघेही वेगवेगळ्या धर्माचे आहेत. म्हणूनच ते दोघेही अनेकदा चर्चेत असतात. लग्नानंतर सोनाक्षीची ही पहिलीच होळी होती. लोक झहीरसोबतच्या तिच्या फोटोंची वाट पाहत होते, पण सोनाक्षीने तिची पहिली होळी तिने एकटीने साजरी केली. हे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर या जोडप्याला ट्रोल केलं जात आहे. सोनाक्षीने फोटोंसह चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्याय मात्र ती एकटीचा का होळी खेळतेय झहीर का तिच्यासोबत होळी खेळत नाहीये अशा अनेक प्रश्न विचारण्यात आले.
लग्नानंतरची पहिली होळी सोनाक्षीने एकटीच का खेळली?
अनेक नेटकऱ्यांचे प्रश्न असेच होते की, झहीर कुठे आहे? तर एकाने म्हटलं ‘तो रंग लावणार नाही’, तर काही लोकांनी म्हटलं की ‘रमजान साजरा करायला गेला असेल’ काही लोक असेही म्हणाले की “लग्नानंतरची ही त्यांची पहिली होळी आहे आणि त्यांनी ती एकत्र साजरी करावी” एकामागून एक अशा कमेंट्स येत होत्या. पण अखेर या सर्व ट्रोलर्सला सोनाक्षीने उत्तर दिलं आहे. तिने या सर्व ट्रोलिंगवर चोख उत्तर दिलं आहे.
ट्रोलर्सना सोनाक्षीचे उत्तर
ट्रोलर्सना उत्तर देताना सोनाक्षीने म्हटलं आहे ” होळी आहे!’ रंग खेळा, होळी साजरा करा, माझ्या मित्रांनो, ‘जटाधारा’च्या शूटींगवरून होळीच्या शुभेच्छा. कमेंट्समध्ये आराम करा, झहीर इक्बाल मुंबईत आहे आणि मी शूटिंगसाठी आहे, म्हणून तो माझ्यासोबत नाही. आता डोक्यावर थंड पाणी ओता”.
दरम्यान फोटोंमध्ये ती पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान केलेली दिसत आहे. फोटोंमध्ये सोनाक्षी कपाळावर लाल बिंदी लावलेली दिसत आहे. सोनाक्षीचा होळीबद्दलचा उत्साह दिसत असून ती फोटोंमध्ये पोज देताना दिसत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List