Video : स्मिता पाटील स्वप्नात येऊन लेकाच्या होणाऱ्या पत्नीला म्हणाल्या…; पाहा नेमकं प्रतिक बब्बरने काय सांगितलं
अभिनेता प्रतिक बब्बरने प्रिया बॅनर्जीशी १४ फेब्रुवारी २०२५ रोजी विवाह केला. प्रतिक बब्बरची आई आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या घरी हा विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याला त्याचे वडील राज बब्बर, सावत्र भाऊ आर्य बब्बर आणि बहीण जुही बब्बर उपस्थित नव्हते. मात्र, प्रतीकने दावा केला आहे की, त्याचे कुटुंबीय आणि मित्र उपस्थित होते. आता लग्नाच्या एक महिन्यानंतर प्रतिकने लग्नाचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने सांगितले आहे की त्याची आई, स्मिता पाटील स्वप्नात आली होती. आणि तिने सल्ला दिला होता. आता स्मिता पाटील लेकाच्या स्वप्नात नेमकं काय म्हणाल्या चला जाणून घेऊया…
काय म्हणाल्या स्मिता पाटील?
प्रतिकने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाला एक महिना झाल्यानंतर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो बोलताना दिसत आहे की, ‘माझी आई आमच्या स्वप्नात आली होती. मला वाटतं, माझ्या आईने प्रियाला सांगितलं होतं की आपण ज्या घरात राहतो त्याच घरात लग्न करा. त्या घराला माझ्या आईचा आणि आजी-आजोबांचा आशीर्वाद आहे. आम्ही लग्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही. आमची भेट ही काही पहिलीच वेळ नाही. हे पहिल्यांदाच होत नाही. मी तिचा आणि ती माझी आहे. ही पहिलीच वेळ नाही.’
वाचा: बिनकामाचे वाद उकरून काढून…; मटणाच्या सर्टिफिकेट्सवरुन अभिनेत्याची पोस्ट
सुंदर लग्नाचा व्हिडिओ प्रतीकच्या ‘कान्ट हेल्प फॉलिंग इन लव्ह विथ यू’ या गाण्याने सुरू होतो. प्रतिकने हे गाणे त्याची पत्नी प्रियासाठी गायले आहे. मेहंदी फंक्शनमध्ये प्रिया बॅनर्जीने पुन्हा तेच गाणे गायले. प्रिया प्री-वेडिंग फंक्शनमध्ये प्रतीकला मजेदार पद्धतीने लग्नासाठी विचारताना दिसते. त्यानंतर ती मजेशीर अंदाजात प्रतिकला आशीर्वाद देत म्हणते, “सदा सुहागन रहो.” ते ऐकून सर्वांना हसू अनावर होते.
स्मिता पाटील यांच्या घरात का केले लग्न?
मग प्रिया बॅनर्जी प्रतीकला विचारते, “तू आयुष्यभर माझी काळजी घ्यायला तयार आहेस का?” स्मिता पाटील यांच्या घरी मेहंदी, पायजमा पार्टी आणि लग्न समारंभातील आनंदाचे क्षण व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहेत. यापूर्वी, व्होग इंडियाशी बोलताना प्रतीक बब्बरने आपल्या दिवंगत आईच्या घरी लग्न करण्याच्या कल्पनेबद्दल सांगितले. तो म्हणाला, “आम्ही ‘होम वेडिंग’चा विचार केला होता. माझ्या आईने विकत घेतलेले पहिले घर आणि माझे घर हे तिच्या आत्म्याचा सन्मान करण्याचा सर्वोत्तम मार्ग होता.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List