अभिनेत्री सायली संजीव अशोक सराफांना ‘पप्पा’ का म्हणते? आहे खास कारण
मराठी अभिनेत्री सायली संजीवची पुन्हा एकदा चर्चा होताना दिसत आहे. ती आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतली आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सायली सज्ज झाली आहे. अभिनेत्री सायली संजीव मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिची ‘काहे दिया परदेस’ ही मालिका विशेष गाजली. या मालिकेच्या माध्यमातून सायली घराघरात पोहोचली. या मालिकेने निरोप घेतल्यानंतर सायलीने अनेक चित्रपटांमध्येही काम केले. परंतु, आता तिच्या चाहत्यांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. सायली लवकरच छोट्या पडद्यावर कमबॅक करण्याची शक्यता आहे.
सायली निवेदिता सराफ यांच्यासारखी दिसते म्हणून…
सायली लवकरच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार असल्याचं म्हटलं जात आहे. सायलीचा मोठा चाहतावर्ग आहे. सायली सोशल मीडियावर सक्रिय असून अनेकदा तिचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असते. सायली ही दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांची पत्नी तथा अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्यासारखीच दिसत असल्याचं अनेकांनी म्हटलं होतं.
तसेच तिला याबद्दल अनेकदा तिला विचारणाही झाली आहे. एवढंच नाही तर तिने अशोक सराफांच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टा स्टोरीमध्ये फोटो पोस्ट केला आहे. अशोक सराफ यांच्यासोबतचा तिचा फोटो पोस्ट करत तिने ‘हॅपी बर्थडे पप्पा’ असं लिहिलं होतं. यानंतर तर अधिकच चर्चा होऊ लागली.
म्हणून ती अशोक सराफांना ‘पप्पा’ म्हणते
अखेर एका रेडिओ चॅनलच्या मुलाखतीदरम्यान चाहत्याने सायलीला यासंदर्भातील प्रश्नही विचारला होता की, ‘तुम्ही अशोक सराफ आणि निवेदिता यांची मुलगी आहात का?’,या प्रश्नावर सायली म्हणाली होती “तुम्ही असं समजू शकता. माझी काहीच हरकत नाही. मला याआधीही अनेकांनी हा प्रश्न विचारला होता. परंतु माझ्या वडिलांचं नाव संजीव चंद्रशेखर आणि आईचं नाव शुभांगी चंद्रशेखर आहे.’ अनेकदा लोकांचा गैरसमज होतो.
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ सायलीला मुलगी का मानतात?
अशोक सराफ आणि निवेदिता यांना मुलगी नाही. त्यामुळे त्यांनी मला नेहमीच त्यांच्या मुलीसारखं वागवलं आहे. म्हणूनच मी त्यांना पप्पा म्हणून हाक मारते’ असं म्हणतं ती अशोक सराफांना ‘पप्पा’ का म्हणते याबद्दल स्पष्ट केलं आहे.
मराठी कलाविश्वातील आदर्श जोडपं म्हणून निवेदिता व अशोक सराफ यांच्याकडे पाहिलं जातं. गेली कित्येक वर्षे या दोघांनी रसिक प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलेलं आहे. अशोक व निवेदिता यांना एक मुलगा असून त्याचं नाव अनिकेत सराफ आहे. याशिवाय त्यांनी अभिनेत्री सायली संजीवला आपली मुलगी मानतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List