धनदांडग्यांना सवलती, सामन्यांची निराशा; अर्थसंकल्पावर रोहित पाटील यांची टीका

धनदांडग्यांना सवलती, सामन्यांची निराशा; अर्थसंकल्पावर रोहित पाटील यांची टीका

कुठल्याच विभागाला पुरेसा असा निधी देण्यात आला नाही. आजचं जर अर्थसंकल्प पाहिलं तर धनदांडग्यांना काही सवलती देण्यात आल्या आहेत. पण सर्वसामान्यांच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात फक्त निराशा आम्हाला दिसत आहे. विरोधक आणि राज्यातील नागरिक म्हणून आम्ही सगळे या अर्थसंकल्पाचा आम्ही निषेध करतो, अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया देताना असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील म्हणाले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले.

‘लाडक्या बहिणींची फसवणूक’

लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारवर टीका करत रोहित पाटील म्हणाले की, “निवडणुकीत हे सांगत होते की, आम्हाला निवडून दिलं तर, 1500 चे 2100 करू, अन्यथा हे 1500 देखील बंद होतील, अशा प्रकारची फसवणूक या सरकारने निवडणुकीच्या काळात केली. आता हे लोक येऊन म्हणत आहेत की, आम्ही 2100 ची घोषणाच केली नव्हती. 1500 आम्ही कागदावर लिहिलं होतं, असं छातीठोकपणे यांचे आमदार सांगतात. एकूण या अर्थसंकल्पाला अर्थसंकल्पीय भाषण असं न म्हणता, मी फसवणुकीचे भाषण असं म्हणेल.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बुडीत बँकांच्या पाच लाखांहून अधिक ठेवी असलेल्यांवर आता दुहेरी संकट, पाहा काय घडले? बुडीत बँकांच्या पाच लाखांहून अधिक ठेवी असलेल्यांवर आता दुहेरी संकट, पाहा काय घडले?
भारतीय रिझर्व्ह बँकेने न्यु इंडीया सहकारी बँकेवर नुकतेच कडक निर्बंध जाहीर केल्याने ठेवीदार हवालदील झाले आहेत. ठेवीदारांना त्यांच्या कोणत्याही खात्यातून...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरावर दगडफेक, RSS कडून शक्तीप्रदर्शन करत…
इंग्लंडजवळील उत्तर समुद्रात तेलवाहू जहाज आणि मालवाहू जहाजांमध्ये टक्कर, दुर्घटनेत 23 जणांचा मृत्यू; बचाव कार्य सुरू
यंदा अर्थसंकल्प सादर करताना गुलाबी जॅकेट का नाही घातलं? अजित पवार यांनी दिले उत्तर
धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव घेताना अजित पवार चुकले
Ratnagiri News – भैयाजी जोशी यांच्यावर कारवाई करावी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची निवेदनाद्वारे मागणी
सर्वसामान्यांचा विश्वासघात करणारा, दिशा नसलेला पोकळ अर्थसंकल्प; हर्षवर्धन सपकाळ यांची टीका