‘छावा’ आवडलाय? मग त्यासारखेच ऐतिहासिक कथानक असलेले ‘हे’ चित्रपट पाहू शकता
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणाऱ्या या चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाला थिएटरमध्ये भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तुम्हाला 'छावा' हा चित्रपट आवडला असेल तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर इतरही काही ऐतिहासिक कथानक असलेले चित्रपट आहेत, जे तुम्ही पाहू शकता..
मंगल पांडे - ब्रिटिश राजवटीविरुद्ध 1857 च्या बंडाला सुरुवात करणाऱ्या मंगल पांडे यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे. यामध्ये आमिर खानने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटालाही ए. आर. रहमान यांनी संगीत दिलं आहे. हा चित्रपट तुम्ही ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.
या चित्रपटात भगतसिंग यांचा तरुण देशभक्त ते एका निर्भय क्रांतिकारकापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे ज्याने आपल्या विचारसरणी आणि कृतींनी ब्रिटिश राजवटीला आव्हान दिले. राजकुमार संतोषी दिग्दर्शित हा चित्रपट त्याच्या ऐतिहासिक अचूकता, आकर्षक कथाकथन आणि एका निर्भय योद्ध्याच्या भावनिक चित्रणासाठी वेगळा आहे.
अशोका- भारतातील सर्वांत शक्तीशाली शासकांपैकी एक असलेल्या सम्राट अशोका यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात अभिनेता शाहरुख खानने मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
तान्हाजी : द अनसंग वॉरियर- अभिनेता अजय देवगणने यामध्ये तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे. तान्हाजी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सेनापती होते. मुघल सेनापती उदयभाग सिंग राठोडकडून कोंढाणा किल्ला परत मिळवण्याची त्यांची धाडसी मोहीम या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट पाहू शकता.
बाजीराव मस्तानी- संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा बिग बजेट चित्रपट ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहता येईल. यामध्ये रणवीर सिंह, दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
रुद्रमादेवी- 13 व्या शतकातील काकतीय राजवंशातील महत्त्वाच्या शासकांपैकी एक असलेल्या रुद्रमा देवी यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे. यामध्ये अनुष्का शेट्टीने मुख्य भूमिका साकारली आहे. त्याचसोबत अल्लू अर्जुन, राणा डग्गुबती आणि प्रकाश राज यांच्याही त्यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.
स्ये रा नरसिम्हा रेड्डी- ब्रिटीश राजवटीविरुद्ध बंड करणारे स्वातंत्र्यसैनिक उय्यालवाडा नरसिंह रेड्डी यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे. यामध्ये मेगास्टार चिरंजीवी यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. याशिवाय अमिताभ बच्चन, नयनतारा, अनुष्का शेट्टी, विजय सेतुपती, किच्चा सुदीप, जगपती बाबू आणि तमन्ना भाटिया यांच्याही त्यात भूमिका आहेत. हा चित्रपट ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List