प्रेग्नेंट बायकोला सोडून संजूबाबाने भोगला तुरुंगवास, 9 महिने कोणी घेतली मान्यताची काळजी?
अभिनेता संजय दत्त पत्नी मान्यता दत्त आणि जुळ्या मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा संजूबाबा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. 1993 मध्ये झालेल्या ब्लास्टमध्ये संजूबाबाला तुरुंगवास भोगावा लागला होता. अभिनेत्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली तेव्हा संजयची तिसरी पत्नी मान्यता प्रेग्नेंट होती. तेव्हा मान्यताची जबाबदारी अभिनेच्याने एका जवळच्या मैत्रीणीवर सोपवली होती. संजूबाबाच्या मैत्रीणीचं नाव आहे शीबा आकाशदीप…
नुकताच एका मुलाखतीत शीबा आकाशदीप हिने मान्यताच्या प्रेग्नेंसीबद्दल मोठी घोषणा केली आहे. शीबा म्हणाली, ‘संजय दत्तसोबत माझी मैत्री फार जुनी आहे. मी मान्यतासोबत नऊ महिने होती. संजूबाबा तुरुंगात जात असताना त्याने मला फोन केला आणि म्हणाला मान्यता एकटी आहे. तू तिच्याकडे जा आणि तिची काळजी घे… मी रोज संजयच्या घरी जायची आणि मान्यताची पूर्ण काळजी घ्यायची…जेव्हा संजय दत्त नव्हता तेव्हा 9 महिने मी मान्यतासोबत होती…’, आज अभिनेता आनंदी आयुष्य जगत आहे.
तुरुंग संजय दत्त शिकला कुकिंग
तुरुंगातून सुटका झाल्यानंतर संजूबाबाने एका मुलाखतीत मोठं वक्तव्य केलं होतं. ‘जेव्हा मी पहिल्यांदा तुरुंगात गेलो होतो, तेव्हा सुनील शेट्टी, अक्षय कुमार, अजय देवगन, शाहरुख खान मला भेटायला आले होते. तुरुंगात शिक्षा भोगण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. मला दिलासा मिळणार नव्हता, म्हणून त्याबद्दल एवढा विचार का करावा?’
‘आता तुरुंगात राहावं लागणार… हा विचार सतत करून देखील काहीही फायदा नव्हता. मला परिस्थितीचा सामना करावा लागणार होता. तेव्हा मी कुकिंग शिकलो. तुरुंगात वर्कआउट केलं… आणि शिक्षा संपल्यानंतर बाहेर आलो..’ असं देखील संजूबाबा म्हणाला होता. संजय दत्तने अनेकदा त्याच्या तुरुंगातील दिवसांबद्दल सांगितलं आहे.
संजूबाबाच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, वयाच्या 65 व्या वर्षी देखील संदय दत्त बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. अभिनता आत लवकरच ‘वेलकम टू द जंगल’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अक्षय कुमार याच्यासोबत अनेक सेलिब्रिटी महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List