पार्टटाईमच्या नादात गमाविले 11 लाख
पार्ट टाईम जॉबच्या नावाखाली तरुण-तरुणींना सायबर चोरट्यांकडून जाळ्यात अडकविले जात आहे. मागील काही दिवसांपासून अशा घटनांमुळे अनेकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः वारंवार जनजागृती करूनही नागरिकांमध्ये बदल होत नसल्याचे दिसून आले आहे. पार्ट टाईम जॉबद्वारे टास्क पूर्ण करा, लाखो रुपये घरबसल्या मिळवा, हे आमिष अनेकांना आर्थिक फसवणुकीत लोटत आहे.
पार्ट टाईम जॉबद्वारे टास्क पूर्ण केल्यास पैसे कमाविण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तरुणाला तब्बल 10 लाख 80 हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना 22 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत हडपसरमधील ससाणेनगरात घडली आहे. याप्रकरणी 35 वर्षीय तरुणाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 22 फेब्रुवारीला सायबर चोरट्याने तरुणाला फोन करून पार्ट टाईम जॉबद्वारे टास्क पूर्ण करण्याचे काम सांगितले. त्याद्वारे चांगले पैसे कमवता येतील, असे आमिष दाखविले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तक्रारदाराला लिंक पाठवून टास्क पूर्ण करून घेतला. त्यानंतर सुरुवातीला काही रक्कम सायबर चोरट्यांनी तरुणाला ऑनलाइनरीत्या पाठविली. विश्वास पटल्यानंतर तरुणाने रक्कम गुंतवणुकीस सुरुवात केली. १० लाख 80 हजार रुपये गुंतवल्यानंतरही त्यांना टास्कची रक्कम मिळाली नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List